Nagpur News:'नागपुरात भाजप वार्ड अध्यक्षाच्या खुनाचे तीव्र पडसाद'; विटाभट्टी चौकात नागरिकांचा रस्ता रोको, कारवाई न झाल्याने संताप..

“Nagpur Tense After Killing of BJP Ward Chief: सचिन शाहू शनिवारी केक घेण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांचा खून केला. या घटनेपासून नागरिक संतप्त आहेत. रविवारी दुपारी विटाभट्टी चौकात संतप्त जमाव गोळा झाला. जमावाने दोन्ही बाजूची वाहने रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
“Nagpur Tense After Killing of BJP Ward Chief; Protesters Demand Immediate Action”

“Nagpur Tense After Killing of BJP Ward Chief; Protesters Demand Immediate Action”

Sakal

Updated on

नागपूर: भारतीय जनता पक्षाचे वार्ड अध्यक्ष सचिन शाहू (वय ३०, रा. शाहू मोहल्ला, यशोधरानगर) यांच्या खुनाच्या घटनेचे तीव्र पडसाद रविवारी (ता.१६) उमटले. नागरिकांनी विटाभट्टी चौकात रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली. वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी आरोपींवर कारवाई न केल्याने ही घटना घडल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com