

Inter-District Fraud Case: Sangli Couple Accused of ₹81 Lakh Cheating
Sakal
नागपूर : नागपूर येथील एका कंपनीत तयार झालेले पशुखाद्य खरेदी करून त्याचे पैसे देण्यास चालढकल करीत तब्बल ८१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील व्यावसायिक संतुलाल जमताणी यांनी सांगलीतील दांम्पत्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित सुरेश प्रभाकर पाटील आणि जया सुरेश पाटील (दोघेही रा. दत्तनगर, विश्रामबाग, सांगली) या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.