esakal | नागपूर : आधी भाजपचा विजय, १० मिनिटांनी काँग्रेसच्या उमेदवाराची बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस

सुरुवातीला भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचं सांगितलं गेलं आणि १० मिनिटांनी निकाल बदलल्याचं समोर आलं.

आधी भाजपचा विजय, १० मिनिटांनी काँग्रेसच्या उमेदवाराची बाजी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूरसह काही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या. त्याची मतमोजणी आज सुरु असून काही धक्कादायक असे निकालही हाती येत आहेत. नागपूरमध्ये नगरखेड पंचायत समितीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. तर दवलामेटीमध्ये सुरुवातीला भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचं सांगितलं गेलं आणि १० मिनिटांनी निकाल बदलल्याचं समोर आलं. यात काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारत १० मतांनी निवडणूक जिंकली.

दवलामेटीमध्ये अटीतटीची अशी लढत झाली. यामध्ये काँग्रेसच्या सुलोचना ढोक यांनी अवघ्या १० मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या ममता जैस्वाल यांना पराभूत केलं. तर तिसऱ्या क्रमांकावर वंचितच्या मंगला कांबळे या राहिल्या.

हेही वाचा: Gram Panchayat Elections Results: विहीरगावात नोटा ठरला निर्णायक; ईश्वरचिठ्ठीने निकाल

सुलोचना ढोक आणि ममता जैस्वाल यांच्यात काट्याची टक्कर सुरु होती. यातच सुरुवातीला भाजपच्या ममता जैस्वाल जिंकल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र दहा मिनिटांनी काँग्रेसच्या सुलोचना ढोक विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हेही वाचा: नागपूरात अनिल देशमुखांना धक्का; नगरखेड पंचायत समिती भाजपकडे

काँग्रेसच्या विजयी उमेदवार सुलोचना ढोक यांना २१६१ मते मिळाली. भाजपच्या ममता जैस्वाल यांना २१५१ मते मिळाल्यानं त्यांचा निसटता पराभव झाला. तर वंचितच्या उमेदवार मंगला कांबळे यांनी २ हजार ६४ मते मिळवली.

loading image
go to top