दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, दारुड्या बापाच्या क्रौर्याने घडवले तिहेरी हत्याकांड; नागभीड तालुक्यातील घटना

Chandrapur Triple Murder Case: दारूड्या बापाने आपल्या दोन मुलींसह पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार (ता. ३) पहाटेच्या सुमारास नागभीड तालुक्यातील मौशी येथे उघडकीस आली.
Chandrapur Triple Murder Case
Chandrapur Triple Murder CaseEsakal

Triple Murder Case Nagbhid Father Killed Wife and Daughters: दारूड्या बापाने आपल्या दोन मुलींसह पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार (ता. ३) पहाटेच्या सुमारास नागभीड तालुक्यातील मौशी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अंबादास तलमले याला अटक केली आहे.

मृतांमध्ये आरोपीची पत्नी अलका (वय ४०), मुली प्रणाली (वय १९) आणि तेजस्विनी (वय १०) यांचा समावेश आहेत. या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरून गेला आहे. अंबादास तलमले हे नागभीडपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील मौशी गावाचे रहिवासी आहे. पत्नी अलका, तीन मुली आणि मुलगा अनिकेत, असे अंबादासचे कुटुंब होते.

मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. अंबादासकडे एक एकर शेती आहे. त्याला गेल्या काही वर्षांपासून दारूचे व्यसन जडले. त्यामुळे घर चालवण्यासाठी पत्नी अलका व दोन मुली शेतकाम करायच्या, तर मुलगा पानटपरीवर काम करायचा. त्यातही अंबादास पत्नीकडे नेहमीच दारूसाठी पैसे मागायचा. पैसे न दिल्यास पत्नी, मुलींना मारझोड करायचा. शनिवारी (ता. २) पत्नी अलकाकडे बचतगटाचे काही पैसे होते. त्यामुळे अंबादासने पैशासाठी अलकाकडे तगादा लावला. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अंबादासने घरी चांगलाच वाद घातला होता.(Latest Marathi News)

रविवारी (ता. ३) पहाटे मुलगा अनिकेत पानटपरीवर कामासाठी निघून गेला. पत्नी अलका, मुली प्रणाली आणि तेजस्विनी गाढ झोपेत होते. मायलेकी गाढ झोपेत असल्याची संधी साधून अंबादासने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यात तिघींचाही मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर अंबादास घरीच बसून होता.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विजय राठोड यांच्यासह पोलिस गावात पोहचले. त्यांनी अंबादासला अटक केली.

Chandrapur Triple Murder Case
IPL 2024 : रोहितनंतर 'या' खेळाडूची कर्णधारपदावरून हकालपट्टी! फ्रेंचायझीने केली मोठी घोषणा, 'या' स्टारकडे संघाची धूरा

घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांची उपस्थिती होती. या घटनेचा तपास ठाणेदार विजय राठोड करीत आहे.

कुऱ्हाड घेऊन झोपायचा

दारूच्या व्यसनाने अंबादासचे मानसिक संतुलन बिघडले होते. तो गावात अनेकांशी वाद घालयचा. पंधरा दिवसांपूर्वी त्याने गावातील एकाच्या घरात शिरून टीव्ही फोडली. गेल्या तीन महिन्यांपासून कुऱ्हाड घेऊनच तो झोपायचा. त्याच कुऱ्हाडीने अंबादासने पत्नी, दोन्ही मुलींना ठार केले. (Latest Marathi News)

तेजस्विनीच्या स्वप्नांचा चुराडा

■ मृत प्रणाली बारावीनंतर शिक्षण बंद करून शेतीकाम करत होती. लहान मुलगी तेजस्विनीची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. बारावीत चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होण्याचे तेजस्विनीचे स्वप्न होते. मात्र, दारूच्या आहारी गेलेल्या बापाने तिच्या स्वप्नांचा चुराडा केला. मुलगा अनिकेतचीही दहावीची परीक्षा सुरू होती. तरीही तो पानटपरीवर सकाळ, सायंकाळी कामाला जायचा. रविवारीही नेहमीप्रमाणे तो कामाला गेल्यामुळे त्याचा जीव वाचला.

Chandrapur Triple Murder Case
Asim Sarode Alleged Cm Eknath Shinde Mlas: एअरहॉस्टेस चा विनयभंग? गुवाहाटीमध्ये २ आमदारांना कुणी मारहाण केली? असीम सरोदे यांचे गंभीर आरोप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com