Nagpur Cheat Fund Case: ‘चिटफंड’मधून तीन कोटींची फसवणूक, १४ जणांना घातला गंडा, पाच वर्षांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष

Nagpur 3 Crore Fraud: पाच वर्षांत दामदुप्पट करण्याच्या नावाखाली नातेवाईक आणि मित्रांकडून पैस घेत, ‘चिटफंड’मध्ये गुंतवणूक करीत, दोन कोटी ८७ लाख ९७ हजार ४८० रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.
Nagpur Cheat Fund
Nagpur Cheat Fund Esakal

Nagpur Cheat Fund 14 Frauded: पाच वर्षांत दामदुप्पट करण्याच्या नावाखाली नातेवाईक आणि मित्रांकडून पैस घेत, ‘चिटफंड’मध्ये गुंतवणूक करीत, दोन कोटी ८७ लाख ९७ हजार ४८० रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी १४ जणांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


रमनीतसिंग ऊर्फ साहेब राजिंन्द्ररपालसिंग लांबा (वय ३४, रा. काश्‍मिरी गल्ली, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे दुचाकी विक्रीचे शोरूम आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमनितसिंग याने आर.आर. चिट फंडच्या नावाने २०१८ साली स्कीम सुरू करून त्यात पैसे गुंतविल्यास अधिक व्याजासह दुप्पट पैसे मिळतील असे आमिष दाखविले.

त्यानुसार, महिन्याला ९ हजार ९९९ रुपये अशाप्रकारे १४ जणांनी पैसे गुंतविले. त्याने दर महिन्याला गुंतवणूक दाराला बनावट पावत्याही दिल्यात. २०१८ ते २०२२ या दरम्यान पैसे गुंतविल्यावर ते पैसे योजनेनुसार परत करण्याची वेळ आली, तेव्हा त्याने टाळाटाळ केली. याशिवाय त्याने दिलेल्या पावत्याही बनावट असल्याचे समोर आले. (Latest Marathi News)

त्यामुळे चौदाही जणांनी तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी द प्राईज चिट अॅण्ड मनी सर्क्युलेशन अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याची माहिती असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

Nagpur Cheat Fund
Donald Trump: ट्रम्प यांची विजयी घोडदौड सुरुच; प्रतिस्पर्धी निक्की हेले यांना साऊथ कॅरोलिनात धक्का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com