नागपूर शहरात आढळले ७२३ बाधित; ७ नवे ओमिक्रॉनचे रुग्ण | Nagpur Corona Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Corona Update
नागपूर शहरात आढळले ७२३ बाधित; ७ नवे ओमिक्रॉनचे रुग्ण

नागपूर शहरात आढळले ७२३ बाधित; ७ नवे ओमिक्रॉनचे रुग्ण

नागपूर : शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचा(Corona) उद्रेक होत असून गेल्या चोवीस तासांत ८३२ नवे बाधित(Corona) आढळून आले आहेत. यात शहरातील ७२३ जणांचा समावेश आहे. याशिवाय नवे सात ओमिक्रॉन रुग्ण(Omicron Patient) आढळून आले आहे. त्यामुळे शहरवासींनी सावध होऊन कोविड नियमांचे पालन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आठवड्याभरात ३ हजारावर बाधित आढूळन आल्याने भीतीचे वातावरण आहे. (Nagpur Omicron Update)

हेही वाचा: आजपासून राज्यात नाईट कर्फ्यू, जाणून घ्या काय बंद, काय सुरू?

गेल्या तीन दिवसांपासून बाधितांच्या आकड्यांत शेकडोंची भर पडत आहे. गेल्या तीन दिवसांतील आकडेवारी दोन हजारांपेक्षा जास्त आहे. २४ तासांमध्ये जिल्ह्यात ८३२ नवे बाधित आढळून आले आहे. यात शहरातील ७२३ जणांचा समावेश असून ग्रामीण भागातील ८० जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील २९ जण बाधित आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या ४ लाख ९७ हजार ५८८ पर्यंत पोहोचली आहे. तीन जानेवारीपासून बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आठवडाभरात ३ हजार २६२ बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा, महापालिका प्रशासनाने निर्बंध जाहीर केले असून नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: राज्यात आजपासून नवे निर्बंध, वाचा तुमच्या मनातील १७ प्रश्नांची उत्तरं

बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सक्रीय रुग्णांची संख्या ३ हजार ३४५ पर्यंत पोहोचली आहे. यातील अठरा जण मेडिकलमध्ये, एम्समध्ये ३३ तर मेयोत तिघे उपचार घेत असून इतर संस्थात्मक तसेच गृहविलगीकरणात आहेत. दरम्यान, आज ९६ बाधितांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील ६९ तर जिल्ह्याबाहेरील २७ जणांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये एकाही कोरोनामुक्त झालेल्याची नोंद नाही. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉननेही धडकी भरली आहे. आज ओमिक्रॉनचे सात नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनग्रस्तांची एकूण संख्या ३७ पर्यंत पोहोचली.

हेही वाचा: ओमिक्रॉनचं संकट; आढावा बैठकीत मोदींनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

आज आढळून आलेल्या सातपैकी चार जण विदेशातून आले आहेत. ओमीक्रॉनग्रस्तांत तीन महिलांचाही समावेश आहे. ओमिक्रॉनग्रस्तांवर एम्स तसेच खासगीमध्ये उपचार सुरू आहे. एक जण यातून बरा झाला असून त्याला गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. ओमिक्रॉनग्रस्तांच्या संपर्कातील नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.

खासगी लॅबवर नागरिकांचा भरवसा

चाचण्यांसाठी नागरिक आता खाजगी लॅबवर अधिक भरवसा करीत असल्याचे चित्र आहे. २४ तासांत आढळून आलेल्या ८३२ पैकी ४९८ जणांचे अहवाल खाजगी लॅबमधील आहेत. एम्समधून ८०, मेडिकलमधून ११७, मेयोतून ८७, नीरीतून ४४ नमुन्यांचे अहवाल आलेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top