आजपासून राज्यात नाईट कर्फ्यू, जाणून घ्या काय बंद, काय सुरू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

night curfew
आजपासून राज्यात नाईट कर्फ्यू, जाणून घ्या काय बंद, काय सुरू?

आजपासून राज्यात नाईट कर्फ्यू, जाणून घ्या काय बंद, काय सुरू?

मुंबई : कोरोनाचा संसर्ग(corona) आणखी वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यासाठी सरकार पातळीवर हालचाली सुरू आहेत. सोमवारपासून राज्यात नवी नियमावली(corona restrictions) लागू होणार आहे. संचारबंदी(curfew) आणि जमावबंदीच्या काळात विनाकारण पाचपेक्षा अधिकजण एकत्र येणाऱ्या आणि रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई (legal action)होणार आहे. ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेकडे दुर्लक्ष करून बिनधास्त व्यवहार करणाऱ्यांना धडा शिकवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: राज्यात दिवसभरात ४४ हजारांहून अधिक रुग्ण

लशींचे डोस न घेतलेल्यांवरील बंधनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोना रोखण्यासाठी जाहीर केलेला नियम शंभर टक्के अमलात आणण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. नवे नियम रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू झालेत. त्यामुळे सोमवारी सकाळपासून खबरदारीच्या उपायांनुसारच व्यवहार सुरू राहणार आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक चिंता वाढवत असल्याने राज्य सरकारने नवी नियमावली तयारी केली आहे.

हेही वाचा: राज्यमंत्री यड्रावकरांसह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

महत्त्वाचा बदल

  1. पहाटे पाच ते रात्री अकरादरम्यान जमावबंदी

  2. रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळांत संचारबंदी

हेही वाचा: 'शरद पवारांवर टीका करणाऱ्यांच्या बुध्दीची किव येते'

काय सुरू?

  1. मॉल, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहेही ५० टक्के क्षमतेनेच सुरू राहणार

  2. व्यायामशाळा (जिम) (५० टक्के क्षमतेने)

  3. ब्युटी पार्लर, हेअर सलून (५० टक्के क्षमतेने)

  4. सार्वजनिक वाहतूक सेवा (दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मुभा)

  5. लोकल सेवा

काय बंद?

  1. महाविद्यालये, शाळा

  2. उद्याने, प्राणीसंग्रहालय बंद

  3. मनोरंजन उद्याने, किल्ले

हेही वाचा: ...म्हणून गिरीशभाऊंनी बुधवारपेठेत जावे - खडसे

कार्यक्रमांवर नजर

कोरोना नियमांची सर्वच पातळ्यांवर अंमलबजावणी व्हावी म्हणून विविध खात्यांच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरच्या प्रमुखांना सूचना केल्या गेल्या आहेत. दुसरीकडे, लस घेण्याकडे दुर्लक्ष केलेल्यांना सेवा घेण्यास बंदी घालण्यात आल्याने त्याच्या अंमलबजावणीलाही प्राधान्य देण्याची तयारी सरकारने केली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील यासाठी प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि अन्य यंत्रणांनी केली आहे. लग्न समारंभासह राजकीय-अराजकीय कार्यक्रमांच्या ठिकाणी पाहणी करून नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार आहे.

नियम मोडणाऱ्यांवर काय कारवाई?

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील सेवांची तपासणी होणार आहे. त्यांची क्षमता जाहीर करण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्यांना पाच ते ५० हजार दंड ठोठावला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Lockdown Night Curfew Omicron Corona Guidelines Covid Rules Gym Mall Local Train

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top