Nagpur: बांधकाम मंत्र्यांच्या शहरात ड्रेनेज सिस्टिमचा फज्जा ! प्लास्टिक बंदीला नागपूरकरांनी दाखवली केराची टोपली

Nagpur Drainage System Failure: कारवाईनंतरही वापर : ड्रेनेज लाईन तुंबण्यासह पर्यावरणाला धोका,प्लास्टिक पिशव्या बंदीचा फज्जा
Nagpur: बांधकाम मंत्र्यांच्या शहरात ड्रेनेज सिस्टिमचा फज्जा ! प्लास्टिक बंदीला नागपूरकरांनी दाखवली केराची टोपली
Updated on

Nagpur Plastic Ban: शहरात बंदी असलेल्या सिंगल यूज्ड प्लास्टिक व पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असून बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. भाजी व फळ विक्रेत्यांसह हॉटेलमध्येही सिंगल यूज्ड प्लास्टिक बॅग वापरल्या जात असून आजही दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे घरातून या प्लास्टिक पिशव्या थेट ड्रेनेज, सिवेज लाईनमध्ये जात असून पर्यावरणावरही संकट कायम आहे.

महापालिकेने शहरात दोन वर्षांपासून सिंगल यूज्ड प्लास्टिक व पिशव्यांवर बंदी घातली आहे. विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नियुक्ती केली. पथकाकडून दररोज कारवाई केली जात आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेकडून कापडी पिशव्यांच्या वापरासाठी जनजागृतीही केली जात आहे. परंतु शहरातील विक्रेत्यांकडून अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे उपद्रव शोध पथकाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

उपद्रव शोध पथकाने २३ जून २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ४ हजार ३०२ विक्रेते व व्यापाऱ्यांकडून २ कोटी २४ लाखांचा दंड वसूल केला. आजही उपद्रव शोध पथकाने चार विक्रेत्यांकडून दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून २० हजारांचा दंड ठोठावला. सतत दंडात्मक कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा शहरात वापर सुरू आहे. भाजी व फळ विक्रेत्यांकडून सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे.(Latest Marathi News)

Nagpur: बांधकाम मंत्र्यांच्या शहरात ड्रेनेज सिस्टिमचा फज्जा ! प्लास्टिक बंदीला नागपूरकरांनी दाखवली केराची टोपली
Rajasthan Politics: 'राजस्थानमध्ये नेतृत्वावरून वाद नाही', हैदराबाद दौऱ्यात काय म्हणाले सचिन पायलट?

भाजी खरेदीसाठी ग्राहक पिशव्या आणत नाही. त्यांना प्लास्टिक पिशवी दिली नाही तर ते भाजी खरेदी करत नाही. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा नाईलाजास्तव वापर करावा लागत असल्याचे एका भाजी विक्रेत्याने नमुद केले.

प्लास्टिक पिशव्यांसाठी कपड्यांच्या पिशव्या पर्याय आहे. परंतु हा पर्याय महाग आहे. आम्हा दुकानदारांना कापडी पिशव्या देणे परवडत नाही. त्यामुळे फेरीवाले, लहान दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे एकाने सांगितले. महापालिकेने कठोर भूमिका घेत याच वर्षी प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीचा कारखाना उघडकीस आणला. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला.(Latest Marathi News)

Nagpur: बांधकाम मंत्र्यांच्या शहरात ड्रेनेज सिस्टिमचा फज्जा ! प्लास्टिक बंदीला नागपूरकरांनी दाखवली केराची टोपली
Ajit Pawar: राज्यात अवकाळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

तरीही शहरात व्यापारी, विक्रेत्यांपर्यंत प्लास्टिक पिशव्या पोहोचत असल्याने महापालिकेपुढेही आव्हान उभे ठाकले आहे. तुंबलेल्या सिवेज लाईन, ड्रेनेज लाईन स्वच्छ करताना यातून प्लास्टिक पिशव्याच मोठ्या प्रमाणात निघत असल्याचे एका सफाई कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे तुंबलेल्या सिवेज लाईनसाठी प्लास्टिक पिशव्या मोठा रोग ठरत आहेत.

शहर सिमेवरील गावांमध्ये नियंत्रणच नाही

शहरात महापालिकेचे उपद्रव शोध पथक कारवाई करीत आहे. परंतु शहराला लागून असलेल्या बेसा, बेलतरोडी, पिपळा, वाडी, इसासनी या गावांमध्ये विक्रेते, वापरकर्त्यांवर कुठलेच नियंत्रण नाही. अनेकदा या भागातील सफाई कर्मचारी कचरा जाळताना त्यात या पिशव्या जाळल्या जातात. परिणामी पर्यावरणावरही धोक्यात येत आहे. (Latest Marathi News)

Nagpur: बांधकाम मंत्र्यांच्या शहरात ड्रेनेज सिस्टिमचा फज्जा ! प्लास्टिक बंदीला नागपूरकरांनी दाखवली केराची टोपली
Ravikant Tupkar:मुंबईत धडाडणार तुपकरांची तोफ ! मंत्रालयाचा घेणार ताबा, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तुपकर आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com