Nagpur News : काँग्रेसच्या बैठकीत विकास ठाकरे - नरेंद्र जिचकार यांच्यात धक्काबुक्की

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या विभागीय आढावा बैठकीत गुरुवारी मोठा राडा
nagpur congress meeting vikas thackeray and narendra jichkar clash politics nana patole
nagpur congress meeting vikas thackeray and narendra jichkar clash politics nana patoleSakal

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या विभागीय आढावा बैठकीत गुरुवारी मोठा राडा झाला. शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार आणि समर्थकांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाल्याने मोठी खळबळ उडाली. सुमारे दोन तास त्यामुळे गोंधळ झाला.

दत्तात्रयनगर येथील महाकाळकर सभागृहात गुरुवारी जिल्हानिहाय नागपूर विभागाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, सुनील केदार, नाना गावंडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे,

आमदार अभिजित वंजारी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मीडिया सेलेच प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, उमाकांत आग्निहोत्री, प्रफुल्ल गुडधे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके, अल्पसंख्यांक सेलचे वसीम खान, दक्षिण नागपूरचे प्रभारी प्रशांत धवड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

पहिली आढावा बैठक नागपूर शहराची होती. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी सर्व संघटनात्मक बाबीचा आढावा सादर केला. त्यानंतर सर्वांचे आभार मानत असताना अचानक नरेंद्र जिचकार मंचावर आले आणि त्यांनी माईक हिसकावला. त्यामुळे वादाला सुरुवात झाली. दोघांमध्ये धक्काबुक्की होताच कार्यकर्ते मंचावर धावले.

ठाकरे समर्थक जिचकार यांच्या अंगावर धावून गेले. झटापटीत जिचकार यांचा शर्ट फाटला. त्यामुळे मंचावर आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. कोणीच कोणाला ऐकत नव्हते. दोघांचेही समर्थक एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता.

nagpur congress meeting vikas thackeray and narendra jichkar clash politics nana patole
Nagpur: नागपूर काँग्रेसच्या बैठकीत विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या समोरच कार्यकर्त्यांचा तुफान राडा!

शेवटी विकास ठाकरे यांनी माईक हाती घेऊन सर्वांना शांत केले. त्यांनी बैठकीत गोंधळ घालणाऱ्या जिचकारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. विकास ठाकरे मंचावरून परत जात असताना पुन्हा जिचकार उठून पुटपुटले. त्यामुळे नव्याने गोंधळाला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. ठाकरे सभागृहातून निघून गेल्यानंतर वातावरण शांत झाले.

जिचकार मानसिक रुग्ण ः ठाकरे

नरेंद्र जिचकार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी विचित्र बोलून वातवरण खराब केले होते. स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार केली आहे. शहराच्या आढावा बैठकीत त्यांना बोलण्याचा काही अधिकार नव्हता. असे असतानाही असभ्यपणे त्यांनी माईक हिसकावला. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे दिसून येते असे या घटनेनंतर विकास ठाकरे यांनी सांगितले.

गोंधळ नव्हे उत्साह ःपटोले

बैठकीत कुठलीच हातपाई झाली नाही. कार्यकर्ते उत्साहात होते. त्यामुळे गोंधळसदृष्य परिस्थिती झाली होती. गोंधळाचे व्हीडीओ खरे आहेत की नाही हे तपासून बघावे लागले. आपल्या अपरोक्ष कोणी गोंधळ घातला असेल आणि शिस्तीचा भंग केला असेल तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

उदयपूरच्या अधिवेशनात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या बैठकीच्या अजेंड्यामध्ये हा विषय होता. मात्र त्यावर चर्चेविनाच बैठक आटोपली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मत मांडण्यासाठी आपण मंचावर गेलो होते.

मात्र मला बोलू दिले नाही, उलट धक्काबुक्की केली. पक्षाच्या निमंत्रणावरून बैठकीला गेलो होतो. नेत्यांच्या समोर बोलणाचे नाही तर केव्हा बोलायचे. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपणास रोखले. हा आपल्यावरचा नव्हे तर प्रदेशाध्यक्ष यांच्यावर झालेला हल्ला आहे.

- नरेंद्र जिचकार, सचिव, प्रदेश काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com