नागपूर : दीक्षान्त समारंभ मराठमोळा करणार

शासकीय तंत्रनिकेतनचा पदवीदान समारंभ
 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत sakal

नागपूर: ब्रिटिश निघून साडेसात दशक झाले मात्र दीक्षान्त समारंभाचे स्वरूप तसेच आहे. युवकांचा समारंभ असताना त्यात जोश कुठेच दिसत नाही. उलट लांबलचक कार्यक्रमामुळे अनेकांना झोपा येतात. त्यामुळे पुढील सत्रापासून हा समारंभ मराठमोळ्या पद्धतीने साजरा करण्यात येईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्र निकेतन स्वायत्त संस्थेचा २४ व्या पदविका प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य तथा नियामक मंडळाचे सदस्य सचिव डॉ. मनोज डायगव्हाणे,

दीक्षान्त समारंभ मराठमोळा करणार

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजचे संचालक राजेश चौधरी, शासकीय तंत्र निकेतनचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. बारस्कर उपस्थित होते. सावंत म्हणाले, पदविका प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा असावा. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी या सोहळ्यातच मार्गदर्शन मिळावे. हे लक्षात घेऊन पदविका प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळावे, उद्योग, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, नामांकित कंपन्यांचे व्यावसायिक यांना आमंत्रित करण्यात यावे. त्यामुळे पदविका प्रदान समारंभात भविष्यात आपल्यात आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली अनुभवाची शिदोरी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ऑफलाईनचा स्वीकार करा

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत अभ्यास केला. त्या काळात ऑनलाइन परीक्षा ही गरज होती. परंतु आता ऑफलाईन परीक्षा पद्धती स्वीकार करणे गरजेचे आहे. ऑनलाइनच्या मानसिकतेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढावे लागेल असे आवाहन सामंत यांनी केले. प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे यांनी प्रास्ताविकात नागपूर शासकीय तंत्रनिकेतन व नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचे सांगितले. संचालन अधिव्याख्याता मेघा मचाले तर आभार एम. व्ही. सरोदे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com