नागपूर : बाधित दोन हजारांखाली; १७३२ नव्या कोरोनाग्रस्तांची भर

कालच्या तुलनेत बळी दोनने वाढले असून कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत असल्याचे चित्र
corona Updates  Nagpur
corona Updates Nagpur sakal

नागपूर : बाधितांचा आलेख कालच्या तुलनेत आज घसरला असला तरी बळींची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १ हजार ७३२ बाधित आढळून आलेत. यात शहरातील १ हजार ३६४ जणांचा समावेश आहे. कोरोनाने(corona) तिघांचा मृत्यू झाला असून यात शहरातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. कालच्या तुलनेत बळी दोनने वाढले असून कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. (corona And Omicron Updates Nagpur)

corona Updates  Nagpur
पुण्यात नवे निर्बंध? रुग्ण वाढल्यानंतर अजित पवारांची तातडीची बैठक

गुरुवारी जिल्ह्यात २ हजार ८६ बाधित आढळून आले होते तर एका ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज १ हजार ७३२ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यातील १ हजार ३६४ जण शहरातील, ३०७ जण ग्रामीण भागातील तर ६१ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. सलग वाढत्या बाधितांमुळे बाधितांची एकूण संख्या ५ लाख ४ हजार ६३७ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, आढळून आलेल्या तीन बळींमध्ये शहरातील दोघांचा समावेश आहे. यातील एका बळीचे वय ७२ तर एकाचे ६९ वर्षे असून ते वैशालीनगर व रविंद्रनगरातील आहेत.

corona Updates  Nagpur
UP elections : निवडणूक आयोगाची कारवाई, पोलीस निरीक्षक निलंबित

एक जण जिल्ह्याबाहेरचा आहे. आतापर्यंत गेली सलग तीन दिवस प्रत्येकी एका बळीची नोंद करण्यात आली होती. आज तीन बळींची नोंद करण्यात आली. त्यामुळे आता बळींचाही आलेख वाढतो की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सातत्याने बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सक्रीय रुग्णांची संख्या आठ हजारांंवर गेली. गेल्या चोविस तासांत सक्रीय रुग्णांच्या संख्येत एक हजाराने भर पडली. रुग्णालय तसेच घरीच आता एकूण ८ हजार ३६० सक्रीय रुग्ण आहेत. शहरात ६ हजार ८६६ सक्रीय रुग्ण आहेत. ग्रामीणमधील १ हजार ३८८ तर जिल्ह्याबाहेरील १०६ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत किंवा विलगीकरणात आहेत.

पावणे सातशे बाधितांची कोरोनावर मात

बाधितांची संख्येने निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात ६७२ जणांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक आहे. शहरातील ५८३ जणांनी कोरोनावर मात केली असून ग्रामीणमधील ८९ रुग्ण बरे झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com