esakal | नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच! १७ हजार ५०६ कोरोनाबाधित; आज नवे २ हजार २९७ बाधित
sakal

बोलून बातमी शोधा

सोमवारी नव्याने २ हजार २९७ कोरोनाबाधितांची भर पडल्याने सध्या जिल्ह्यात १७ हजार ५०६ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

सोमवारी नव्याने २ हजार २९७ कोरोनाबाधितांची भर पडल्याने सध्या जिल्ह्यात १७ हजार ५०६ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच! १७ हजार ५०६ कोरोनाबाधित; आज नवे २ हजार २९७ बाधित

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः कोरोनाने असुरक्षितता वाढली असून, सामन्यांच्या मनात आता पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दर दिवसाला दोन हजार पार बाधितांचा आकडा फुगत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी नव्याने २ हजार २९७ कोरोनाबाधितांची भर पडल्याने सध्या जिल्ह्यात १७ हजार ५०६ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या १७ हजार ५०६ झाल्यामुळे प्रशासन चांगलेच हादरले आहे. विशेष असे की, यात शहरातील १४ हजार ४७३ कोरोनाचे रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात ३ हजार ३३ रुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यातील १२ हजार ७२८ रुग्ण गृह विलगिकरणात असून, यांच्यामुळेच कोरोनाचा संसर्ग अधिक गतीने पसरत असल्याची जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात आहे. 

Nagpur Lockdown: पहिल्या दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद; नागरिकांचा रस्त्यावर...

तर मेयो, मेडिकल आणि इतर खासगी रुग्णालयात २ हजार ४८१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आज दगावलेल्या १२ कोरोनाबाधितांमध्ये शहरातील ७ तर ग्रामीण भागातील २ आणि जिल्ह्याबाहेरून रेफर करण्यात आलेल्या ३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ४ हजार ४७१ वर पोहचली आहे.

आज आलेल्या २२९७ बाधितांमध्ये शहरातील १ हजार ९३३ तर ग्रामीण भागातील ३६१ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख ७२ हजार ७९९ कोरोनाबाधितांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. यात शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३८ हजार २५० एवढी झाली आहे. तर ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या ३३ हजार ५६७ झाली आहे. 

जिल्ह्याबाहेरून मेयो, मेडिकलमध्ये ९८२ जणांना रेफर करण्यात आले. सोमवारी जिल्ह्यात चाचण्यांची संख्या रोडावली होती. अवघ्या ८ हजार ८६६ चाचण्या झाल्या. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १३ लाख ८६ हजार २४७ चाचण्या झाल्या आहेत. यातील ९ लाख २५ हजार २२७ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर ४ लाख ६१ हजार २० या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये काय आहे बेड्सची स्थिती;...

कोरोनामुक्त दीड लाखावर

दिवसभरात शहरात १ हजार १५८, ग्रामीण २५१ अशा एकूण १ हजार ४०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या १ लाख २१ हजार ६४५ तर ग्रामीण भागातील कोरोनामुक्तांची संख्या २९ हजार १७७ झाली. एकूण १ लाख ५० हजार ८२२ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. पंधरा दिवसांपासून कोरोनामुक्तांची संख्या कमी झाल्यामुळे टक्केवारीत घट झाली आहे. ९४ टक्क्क्यांवर पोहचलेले कोरोनामुक्ताचे प्रमाण ८७.२८ वर आले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ