Nagpur: रिक्त पदामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur municipal corporation

नागपूर : रिक्त पदामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

नागपूर : शहराची लोकसंख्या, क्षेत्रफळ वाढले असून त्यातुलनेत महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अल्प आहे. दर महिन्याला ३० ते ३५ अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असून रिक्त पदांमध्ये वाढ होत आहे. सध्या महापालिकेतील ३५ टक्के पदे रिक्त असून अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला. परिणामी अनेक अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून त्यांच्या खिशात अक्षरशः हृदयविकार, रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या दिसून येत आहे.

महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची ११ हजार ५२१ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या ७ हजार ११५ पदांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून ४ हजार ४०४ पदे रिक्त आहेत. दर महिन्याला निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. निवृत्ती झालेल्या अधिकाऱ्यांचा भार आधीच विविध जबाबदारीमुळे त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहे. याशिवाय विकास कामांच्या फाईल्ससाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचेही दडपण या अधिकाऱ्यांना सहन करावे लागत आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

यातून अधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढत आहे. विविध विभागप्रमुख, अभियंते, अधिकाऱ्यांच्या खिशात सॉर्बिट्रेट, रक्तदाबासंबंधी विविध गोळ्या दिसून येत आहे. दहा विशेष समित्यांच्या बैठकी, पदाधिकाऱ्यांकडून वेळीअवेळी बोलावणे आल्यानंतर त्यांच्याकडे ये-जा करणे, आयुक्तांची बैठक यातच अधिकाऱ्यांचा बराच वेळ निघून जात असल्याने त्यांच्या कामाचे नियोजनही फसत आहे. परिणामी विकास कामांच्या फाईल्स मंजुरीचा वेगही मंदावला. परिणामी विकास कामांवरही परिणाम होत आहे. परंतु अजूनही पदे भरण्याबाबत महापालिका प्रशासनातील प्रमुखांकडून शासनाकडे काहीही हालचाली नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक विभाग नाइलाजाने कंत्राटदारांच्याच भरवशावर सुरू आहेत. विद्युत विभागामध्ये एका कनिष्ठ अभियंत्याला तीन-तीन झोनचे काम बघावे लागते. एवढेच नव्हे आरोग्य विभागातही अनेक प्रभार एकाच अधिकाऱ्यांकडे आहे.

सभागृहातील महापौरांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष

सप्टेंबरमध्ये सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे रिक्तपदाकडे महापौरांचे लक्ष वेधले होते. महापौर दयाशंकर तिवारी यांनी रिक्त ४ हजार ४०६ पदे तत्काळ भरण्यासंदर्भात प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश दिले होते. परंतु प्रशासन प्रमुखांना या आदेशाचाही विसर पडल्याचे चित्र आहे.

असे आहेत मंजूर व रिक्त पदे

संवर्ग एकूण मंजूर पदे रिक्त पदे

वर्ग १ १९९ ९८

वर्ग २ ७७ ५६

वर्ग ३ ३७९१ २१६६

शिक्षक ७५५ ००

वर्ग ४ २७६० १९४७

सफाई ३९३९ ३१०

एकूण ११५२१ ४४०६

loading image
go to top