Nagpur Corporator Shubham Motghare House Firing
esakal
नागपूर : काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या भांडेवाडी परिसरातील घरावर झालेल्या गोळीबाराचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोटघरे यांनी अमली पदार्थांच्या कारवायांबाबत संबंधित यंत्रणांना माहिती दिल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आला असून त्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एका महिलेसह आणखी चौघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.