Nagpur News : बंटी-बबलीचा प्रताप; खोट्या सोन्याने महिला दुकानदाराची १५ लाखांची फसवणूक
Gold Fraud : नागपूरमध्ये बनावट सोने खरे असल्याचे सांगून बंटी-बबली जोडीने एका चादर विक्रेत्या महिलेला १५ लाख रुपयांनी गंडवले. पोलिसांनी दोघांनाही पुण्यातून अटक करून ७ लाख ८ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
नागपूर : खोटे सोने खरे असल्याचे सांगून बंटी-बबलीने चादर विक्रेत्या महिला दुकानदाराला १५ लाख रुपयांनी गंडविल्याची घटना समोर आली. याप्रकरणी सरला गौरीशंकर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली.