Nagpur Crime: दारू दिली नाही म्हणून थेट केला गळ्यावर वार, ३० वर्षीय आरोपीला अटक

इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू पिण्यास न दिल्याने ३० वर्षीय युवकाने एका इसमावर हल्ला करीत जखमी केले. ही घटना दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास इमामवाडा येथील वाल्मिकी भवनामागे घडली.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal

Nagpur Crime: इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारू पिण्यास न दिल्याने ३० वर्षीय युवकाने एका इसमावर हल्ला करीत जखमी केले. ही घटना दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास इमामवाडा येथील वाल्मिकी भवनामागे घडली.

विजय चंदन उजैनवार (वय ४२, रा. मुक्‍ती कॉलनी, बंगाली कॅम्प, चंद्रपूर) असे जखमीचे नाव असून रजत ऊर्फ मोनू नरेश रामटेके (वय ३०, रा. कुंदनलाल वाचनालयाच्या बाजूला) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता सचिन कागडे (वय ३०) यांच्या घरी विजय हे पाहुणचारासाठी आले होते. (Latest Marathi News)

दरम्यान ते दारू पिण्यासाठी भवनाच्या मागे गेले. तिथे रजत आला. त्याने विजय यांना दारू मागितली. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्याने वाद घालून त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यांनी आरडाओरड करताच तो पळून गेला. विजय यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजतला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू केला आहे.

Nagpur Crime
Ajit Pawar-Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी केली मागणी अन् अजित पवारांनी मंचावरुनच लगावला टोला; नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com