Balaji Kalyane Killing Solved
esakal
नागपूरमध्ये बालाजी कल्याणे नावाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. तसेच त्याची मैत्रीण रती देशमुखदेखील त्याच खोलीत जखमी अवस्थेत आढळून आली होती. दोन दिवसांपूर्वी शहरातील नंदनवन परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला होता. या तरुणाची हत्या नेमकी कशी झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? असे प्रश्न पोलिसांसह नागरिकांनाही पडले होते. मात्र, आता पोलिसांनी या तरुणाच्या हत्येचं गुड उकललं आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे.