esakal | मारहाणीत आईचा पाय फ्रॅक्चर; मग काय भावानेच केला भावाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाणीत आईचा पाय फ्रॅक्चर; मग काय भावानेच केला भावाचा खून

मारहाणीत आईचा पाय फ्रॅक्चर; मग काय भावानेच केला भावाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवलापार (जि. नागपूर) : आईला मारल्याच्या रागावरून लहान भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. अवघ्या चार तासांतच आरोपीला देवलापार पोलिसांना अटक केली. कृष्णा बाबूराव मसराम (३८) मृताचे तर प्रमोद बाबूलाल मसराम (३६) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीसोबत आणखी दोन आरोपी असल्याची शक्यता आहे. त्यात प्रमोद याचे दोन नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. त्या एक अतुल कृष्णा तुराम व एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक असल्याचे सांगण्यात येते. हे सर्व खसाळा (जि. नागपूर) येथे राहतात. (Nagpur-crime-news-Murder-in-Nagpur-rural-brother-killed-Big-brother-Murder-news-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवलापार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चारगाव (मौदी) येथील रहिवासी कृष्णा बाबूलाल मसराम हा मूळचा चारगाव येथील रहिवासी असून तो मौदी येथे घरकुलात राहतो. त्याच्यासोबत भाऊ प्रमोद पण राहायचा. दोघांत नेहमी वादविवाद होत असल्याने तो खसाळा येथे राहू लागला. मंगळवारी रात्री कृष्णा हा आईवडील राहत असलेल्या चारगाव येथे गेला व आई दसवंतीला जबर मारहाण केली. मारहाणीत आईचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजते.

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

याची माहिती प्रमोदला समजताच लगेच चारगावला परतला. त्याचे नातेवाइकांनी दसवंतीला खासगी दवाखान्यात व नंतर देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने तिला डॉक्टरांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये रात्री ‘रेफर’ केले. रात्री बाराच्या सुमारास कृष्णा यावेळी मौदा येथील घरी होता. प्रमोद हा मौद्यावरून आधारकार्ड घेऊन येतो, असे सांगत आईसोबत रुग्णवाहिकेत न जाता मौदा येथे गेला.

कृष्णाच्या घरात शिरून धारदार शस्त्राने वार केले. त्यात कृष्णाचा जागीत अंत झाला. हा प्रकार कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून तो रात्री आईजवळ निघून गेला. मृत रक्ताच्या थारोळ्यात असल्याने काहींच्या लक्षात येताच मौद्याच्या पोलिस पाटीलांनी पोलिसांत तक्रार केली. आरोपी प्रमोद हा मेडिकलमध्ये असल्याची माहिती मिळताच देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे व अन्य सहकारी नागपूरकडे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीस अटक केली. त्याने पुन्हा दोन साथीदाराचे नाव पुढे आणले असून पोलिस त्याबाबतचा तपास करीत आहे.

(Nagpur-crime-news-Murder-in-Nagpur-rural-brother-killed-Big-brother-Murder-news-nad86)

loading image