Photographer Shot Dead: आरोपीच्या शोधात पथके मध्यप्रदेशात ? मित्रांवरही करडी नजर, महिलेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

Nagpur Photographer Shot Dead: काही दिवसांपूर्वी नागपुरमध्ये विनय पुणेकर या फोटोग्राफरवर गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. त्याच्या खुनात प्रेयसीचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे.
Photographer Vinay Punekar Murder Case
Photographer Vinay Punekar Murder CaseEsakal

Nagpur Photographer Vinay Punekar Murder Case: राजनगरातील सुराणा ले आऊटमध्ये राहणाऱ्या विनय पुणेकरची गोळी घालून हत्या करणारा मुख्य आरोपी हेमंत शुक्ला अद्यापही फरार आहे. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह सदर पोलिसांची पथके मध्यप्रदेशात रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

मात्र, घटनेला दोन दिवसाचा कालावधी उलटल्यावरही हायटेक पोलिसांना आरोपी गवसला नसल्याचे दिसून येत आहे. विनयची शनिवारी दुपारी हेमंत शुक्ला याने दोन गोळ्या घालून हत्या केली होती. त्याच्या प्रेयसीनेच विनयचे घर दाखविल्याचे तपासात समोर आले होते. दरम्यान हेमंत हा मध्यप्रदेशाकडे गेल्याची शक्यता वर्तवित, पोलिसांनी त्याच्या तपासासाठी पथके मध्यप्रदेशाकडे रवाना केली.

याशिवाय यापूर्वी महिलेने तो आजमगड येथील रहिवासी असल्याची बतावणी केली होती. मात्र, काहीच क्षणात ती इतर ठिकाणेही सांगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत होती.

मात्र, आता तो मध्यप्रदेशातीलच रहिवासी असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचीही शक्यता तपासण्यात येत आहे. मात्र, महिला चौकशीदरम्यान वारंवार पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर मौन धारण करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मित्रही रडारवर ?
विनयच्या खुनाचे गूढ अद्याप कायम असल्याने पोलिसांनी विनयसह महिला आणि हेमंत शुक्ला यांच्या संपर्कात असलेल्या मित्रांचीही चौकशी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, हेमंतला अटक केल्यानंतरच घटनेचा खुलासा होणार आहे.

Photographer Vinay Punekar Murder Case
Mohammed Shami Surgery: शमीनं हॉस्पिटलमधील फोटो केले शेअर, नेमकं काय झालंय? सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com