Nagpur Crime: शाळेतल्या मुलानेच केला शिवमचा खून

मृताच्या गावचा मुलगाच निघाला मारेकरी
murder
murderesakal

कारंजा (घा.) (जि. वर्धा) - लगतच्या नारा येथील स्व. यादवराव केचे आश्रमशाळेत रक्षाबंधनाच्या दिवशी गाद्यांखाली शिवम सनोज उईके या १३ वर्षींय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला होता. यामुळे त्याच्या मृत्यू विषयी अनेक कयास लावण्यात येत होते. त्याचा खुलासा झाला असून शिवमचा आकस्मिक मृत्यू झाला नसून शाळेत वरच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याचा खून केल्याचे सत्य समोर आहे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी हा मृताच्याच गावचा डोमा ता. चिखलदरा, जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे. त्याचे वय १५ वर्ष आहे. तो याच शाळेत नवव्या वर्गात शिकत आहे. ही घटना रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणात कारंजा पोलिसात खुनाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेत बालन्यायलयात हजर केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

murder
Medical Hospital : भरती व्हायचंय... फॅन घरून आणा!

शाळेत एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्याचा खून होतो. याची माहिती शाळेच्या व्यवस्थापनाला नसते. यामुळे या शाळेचे व्यवस्थापन किती ढिसाळ आहे याचा प्रत्यय येत असल्याने या व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक कुटेमाटे व त्यांची चमू करत आहे.

साहित्य ठेवण्याच्या पेटीवरून झाला वाद

हे दोघेही शाळेच्या आवारात असलेल्या वसतिगृहात एकत्रच राहत होते. त्यांच्यात सामान ठेवण्याच्या पेटीवरून सकाळी वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. नवव्या वर्गात असलेल्या अल्पवयीन आरोपीने शिवमला धक्काबुकी करून जमिनीवर आदळले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तो जागीच ठार झाला.

murder
Nagpur Crime : खेळायला जातो सांगून गेला अन् लावला गळफास

ही घटना कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून शाळेतील गाद्यांच्या ढिगाऱ्यात त्याचा मृतदेह लपवून ठेवला. मुले जेव्हा रात्री झोपण्यासाठी गाद्या काढायला गेली तेव्हा त्यात मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com