Nagpur Crime: कुख्यात ‘सुपारी किलर’ला अटक; डॉक्टरच्या हत्येचा रचला होता कट, दोन देशीकट्ट्यासह नऊ काडतुसे जप्त

आयुर्वेदिक डॉक्टरला लुटून त्याची हत्या करण्याची सुपारी घेऊन मध्यप्रदेशातून आलेल्या ‘सुपारी किलर’ला गुन्हेशाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeEsakal

Nagpur Police Exposed Murder Conspiracy: आयुर्वेदिक डॉक्टरला लुटून त्याची हत्या करण्याची सुपारी घेऊन मध्यप्रदेशातून आलेल्या ‘सुपारी किलर’ला गुन्हेशाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.


आशिष जगदीश शर्मा (वय ३४,रा.अंजनीनगर,भिंड, मध्यप्रदेश), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अमित राजवीर शर्मा(वय ३०) व राहुल (वय ३०, दोन्ही रा. उत्तर प्रदेश),अशी फरार साथीदारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष व त्याचे साथीदार कुख्यात गुन्हेगार आहेत. तपासात तिघांनाही एका आयुर्वेदिक डॉक्टरला लुटून त्याची हत्या करण्याची सुपारी घेतली असल्याचे कळते. त्यासाठीच ते तिघेही नागपुरात आले होते. (Latest marathi News)

दरम्यान गुन्हेशाखेचे उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान बजबळकर, उपनिरीक्षक मधुकर काठोके, सतीश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, दीपक दासरवार, दीपक लाखडे, प्रमोद देशभ्रतार हे कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल हॉटेल मागे गस्त घालत होते. तिघेही पोलिसांना संशयास्पदस्थितीत फिरताना दिसली.

Nagpur Crime
WPL 2024: कोण आहे शोभना आशा? 5 विकेट्स घेत रचला इतिहास, रोमहर्षक सामन्यात RCBचा दोन धावांनी विजय

पोलिस त्यांना पकडण्यासाठी गेले असता दोघे पसार झाले. आशिष हा पोलिसांच्या हाती लागली. त्याच्याकडील पिशवीची पाहणी केली असता पोलिसांना दोन देशीकट्टे, नऊ जिवंत काडतुसे आढळली. चौकशीदरम्यान त्याने एका आयुर्वेदिक डॉक्टरला लुटून त्याची हत्या करण्यासाठी नागपुरात आल्याचे त्याने सांगितले. पोलिस त्याच्या दोन साथीदारांचा व सुपारी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. (Latest marathi News)

Nagpur Crime
ड्रग्ज ट्रॅफिकिंगचा 'मास्टरमाईंड' निघाला तमिळ फिल्म प्रोड्यूसर; 2 हजार कोटींची आतापर्यंत बाहेर देशात शिपमेंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com