
नागपूर : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आजी उपसंचालकानंतर आता माजी उपसंचालक आणि सेवानिवृत्त विभागीय बोर्ड अध्यक्ष अनिल पारधी यांना पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. यापूर्वी मंगळवारी रात्री फरार लक्ष्मण मंघाम (वय ४७, रा. वासंती अपार्टमेन्ट आकांशी ले आउट, दाभा ) याला एसआयटी च्या पथकाने अटक केली होती.फरार मंघामला वाडीतून पोलिसांच्या जाळ्यात घेतले.