esakal | भेटला बाप्पा एकदाचा मोबाईल! हरविलेले ३७ लाखांचे मोबाईल परत
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile App

भेटला बाप्पा एकदाचा मोबाईल! हरविलेले ३७ लाखांचे मोबाईल परत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच सोडून दिली जाते. एवढ्या प्रचंड लोकसंख्येत पोलिस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ज्यांचे महागडे फोन हरवले किंवा चोरीला गेले आहेत असे १२५ मोबाईल सायबर पोलिसांनी (nagpur cyber police) शोधले आहेत. तसेच १११ नागरिकांना त्यांचे मोबाईल परतही केले. (nagpur cyber ​​police recovered 125 stolen mobile phones)

हेही वाचा: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

भाच्याचे लग्न असल्याने घाईघाईत नागपुरातून बसमध्ये बसलो...कुटुंबही सोबत होते...आनंदात लग्न सोहळा पार पाडायचा आणि लग्नात खर्चही करायचा असा बेत होता...बसमध्ये चढलो आणि खिसा तपासतो तर महागडा मोबाईल गायब...बॅग शोधली आणि बसखाली उतरून शोधाशोध केली... मात्र मोबाईल सापडला नाही...बसमधून खाली उतरलो आणि पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली... लग्नाला गेलो पण मन लागेना...पहिल्यांदाच एवढा महागडा मोबाईल घेतला होता... जेमतेम १५ दिवस झाले होते...नातेवाईक आणि मित्र म्हणाले की, आता मोबाईल मिळणारच नाही... त्यामुळे माझा चेहरा पडला...मी पण आशा सोडून दिली...दीड हजार रूपयांचा टपरट मोबाईल घेतला आणि काम भागवले... दोन दिवसांपूर्वी एक फोन आला...सायबर पोलिस स्टेशनमधून बोलतोय...तुमचा मोबाईल सापडला...येऊन घेऊन जा..असे शब्द कानी पडताच आनंद गगनात मावेनासा झाला...आज माझा मोबाईल जसाचा तसाच हातात मिळाला...माझा ऊर भरून आला आणि पोलिसांवरील विश्‍वास आणखीनच वाढला. नागपूर पोलिसांना मनापासून धन्यवाद. अशी प्रतिक्रिया चोरी गेलेला महागडा स्मार्टफोन परत मिळणाऱ्या एका तक्रारकर्त्याने दिली.

मोबाईल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सायबर पोलिसांकडून तपास करून १२५ मोबाईल शोधले. सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी पोलिस मुख्यालयातील अलंकार सभागृहात करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी आणि पोलिस उपायुक्त विवेक मसाळ उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्यात सायबर पोलिसांनी १११ मोबाईल नागरिकांना वितरित केले. त्यानंतर आज १२५ मोबाईल वितरित केले. या मोबाईलची किंमत ३७ लाख इतकी आहे. चोरी गेलेले मोबाईल शोधणे आव्हानात्मक असून नागरिकांनी मोबाईल मिळेल, याची आशा सोडली होती. सायबर पोलिस ठाण्यातील पीआय बागूल, सहायक पोलिस निरीक्षक केशव वाघ, सूर्यकांत चांभारे, कृणाल चांभारे आणि दिपक चव्हाण यांनी अथक मेहनत करून मोबाईलचा शोध घेतला.

loading image