

Nagpur Dating App Crime
esakal
नागपूर : ‘डेटिंग ॲप’वर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग करणे तरुणाला महागात पडले. बहादुरा फाटा येथे भेटण्यासाठी बोलावल्यानंतर दोन आरोपींनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेत मारहाण करून ३० हजार रुपयांनी लुटले.
त्यानंतर मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ दोन आरोपींना अटक केली. अंतरिक्ष ऊर्फ आशू संतोष मिश्रा (वय १९, रा. शिर्डीनगर, हुडकेश्वर) आणि अमित ऊर्फ भुऱ्या मनोज पाटील (वय २३, रा. जयहिंदनगर, हुडकेश्वर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सौरभ शत्रुघ्न परताडे (वय २७, रा. रोहा, मोहाडी, भंडारा, ह.मु. गांधीबाग) यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माहितीनुसार, सौरभची एका डेटिंग ॲपवर दोघांशी ओळख झाली. त्यातून बोलण्यास सुरुवात झाल्यावर त्याने सौरभला बहादुरा परिसरात भेटण्यासाठी बोलावले.
तो येताच, त्याला आपल्या दुचाकीवर बसवीत एका निर्जनस्थळी घेऊन गेले. तिथे त्याला मारहाण करीत त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले, तसेच डेबीट कार्डच्या माध्यमातून पैसे काढून घेत, पसार झाले. याबाबत तक्रार मिळताच, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.