Nagpur Police arrest three accused in a daylight burglary
Sakal
नागपूर : सक्करदरा ठाण्यांतर्गत भर दिवसा घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने केली. पंचाक्षरी संगय्या स्वामी (वय ३८, रा. हिलपार्क अपार्टमेंट, मोदी परिसर, सोलापूर), सय्यद अली मुन्नू अली (वय ३२, रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) आणि मनोज रामचंद्र दिघे (वय ४१, रा. शिंदे चौक, सोलापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.