तणावातून डेंटलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; दोन दिवसांपासून होती बेपत्ता

नापास झाल्याने तणावातून आत्महत्या केल्याची माहिती
suicidal death news
suicidal death newsesakal

नागपूर : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या वैद्यकीय शिक्षणातील दंतशास्त्र अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह शनिवारी (ता. १०) रात्री आठ वाजताच्या सुमारास अंबाझरी तलावात तरंगताना आढळून आला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. काही विषयात नापास झाल्याने तणावातून आत्महत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पूजा रामदास मुळे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथील रहिवासी असलेली पूजा हिंगणा मार्गावर जितेंद्र गौतम यांच्या घरी भाड्याने ती राहत होती. सध्या ती लता मंगेशकर रुग्णालयात दंत शास्त्रात शिक्षण घेत होती. आठ सप्टेंबर रोजी सकाळी ती अचानक घरातून निघून गेली होती. नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या वतीने तिचा शोध घेण्यात आला. काहीही न सापडल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात पूजा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान अंबाझरी तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावर तिचा मृतदेह आढळून आला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घरमालकाला बोलावण्यात आले. त्यांनी मृतदेह पूजाचा असल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पूजाचे वडील आणि भाऊ नागपूरला पोहोचले. या घटनेमागील कारण जाणून घेतले असता ती दंतशास्त्र अभ्यासक्रमातील काही विषयात अनुत्तीर्ण झाली होती. त्यामुळे तणावात होती. पूजा ८ तारखेला घरून निघून गेली होती. शनिवारी रात्री उपनिरीक्षक अवचट यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com