

Nagpur Domestic LPG Cylinder
esakal
नागपूर : सार्वजनिक कार्यक्रमात व्यावसायिक सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी कारवाई केली. राजकमल कॉम्प्लेक्समध्ये गणेशोत्सव महाप्रसादाच्या कार्यक्रमात सुमारे १५० ते २०० नागरिक उपस्थित होते.
प्रदीप दुबे असे कॅटरर्सचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘नॅशनल कम्युनिटी सप्लायर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ संस्थेतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते.यात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याची माहिती ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पोलिस व पुरवठा विभागाला दिली.
त्यानंतर धंतोली पोलिसांनी तपासणी केली असता दोन व्यावसायिक सिलिंडरसह एक घरगुती सिलिंडर व मोठी शेगडी आढळली. सहाय्यक पुरवठा अधिकारी पंकज जळेकर आणि पुरवठा निरीक्षक स्नेहल मांगे यांनी आयोजक व कॅटरर्सविरुद्ध तक्रार दिली.
कॅटरर्स प्रदीप दुबे यांचा त्यात उल्लेख आहे. पोलिस उपनिरीक्षक शुभम बकाल यांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.