Newborn Baby Girl Found Abandoned in Garbage: जन्मदाता आईने जन्मलेल्या नवजात चिमुकलीला काही तासांतच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या धंतोली परिसरात हा प्रकार घडला. हा परिसर उच्चभ्रू नागरिकांचा असून, अशी घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आणि विविध चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर काहींनी मानवतेच्या दृष्टिकोनातून या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.