Cyber Scam: ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये गमावले दोन कोटी; निवृत्त बँक व्यवस्थापक आणि पत्रकारांचे वडील फसले
Cyber Police Action and Account Freezing: नागपुरात सायबर चोरट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’ बनवून निवृत्त बँक अधिकारी व पत्रकाराच्या वडिलांकडून दोन कोटी रुपये लुटले. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही रक्कम गोठवली, शोध सुरू आहे.
नागपूर : दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी निवृत्त बँक व्यवस्थापकासह एका पत्रकाराच्या वडिलांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून दोन कोटी रुपयांनी गंडविले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.