Nagpur : सेन्सॉरसाठीच्या नाट्य संहितांचे डिजिटलायजेशन

सांस्कृतिक ठेव्याचे होणार दस्तऐवजीकरण; योग्यता प्रमाणपत्राचाही समावेश
Natya Parishad
Natya Parishad sakal

नागपूर : भारतीय दस्तऐवजीकरणामध्ये मागे असल्याचे वारंवार बोलले जाते. दस्तऐवजीकरणातून भारतीय ठेवा,‌ संस्कृतीचे अन्‌ प्रतीकांचे नक्कीच जतन होईल. हीच बाब लक्षात घेत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर)कडे पाठविण्यात येणाऱ्या संहिता आणि लेखकांना मिळणारे प्रमाणपत्राचे आता डिजिटलायजेशन (संगणकीकरण) होणार आहे. यामुळे, नाटकासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संहितेच्या (स्क्रिप्ट) रुपात समोर येणारा हा ठेवा जपला जाणार आहे.

Natya Parishad
Nagpur : ताजुद्दीन बाबांच्या वंशजाला जीवे मारण्याची धमकी

नाटक, एकांकिका, छोटी नाटुकली, बालनाट्य, गाण्यांचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, रास-गरबा, जादूचे प्रयोग आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगमंचीय सादरीकरण करण्याआधी त्याची संहिता रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून संमत करून घ्यावी लागते. दर महिन्यामध्ये राज्यभरातील लेखकांकडून हजारो संहिता मंडळाच्या कार्यालयात परिनिरीक्षणासाठी येतात.

Natya Parishad
Nagpur : कुटुंबप्रमुखांच्या बचतीवर महागाईची कुऱ्हाड

कालांतराने भविष्यामध्ये मोठा ठेवा म्हणून नावारुपास येण्याची शक्यता असलेल्या या संहिता कार्यालयात धुळखात राहतात. तसेच, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे दैनंदिन बाब सुरळीत राहावे, मंडळाच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी होत होती. यामुळे, राज्यभरातील लेखकांच्या अनेक अडचणी दूर होणार असून संहितांसह अन्य ठेवा जपला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण

मे. लिस्टा कंपनी, मुंबईला हे काम देण्यात आले असून पहिल्या टप्प्यामध्ये १ जुलै २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीतील दस्तावेजांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने १.५० लाख रुपये मंजूर केले होते.

या पहिल्या टप्प्यातील संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता ०१ डिसेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीतील संहिता, योग्यता प्रमाणपत्रे व नोंदवह्या यांच्या संगणकीकरणाच्या खर्चास मान्यता आली आहे. त्यासाठी २ लाख रुपये शासनाने मंजूर केले होते. लवकरच हे कामही पूर्ण होणार असल्याने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ लवकरच स्मार्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com