नागपूर : दीक्षाभूमीवर येणाऱ्यांची कोंडी

सणासुदीत मनपाला बांधकामाची जाग
नागपूर
नागपूरsakal

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त देशविदेशातील लाखो नागरिक दीक्षाभूमीवर येतात. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना दीक्षाभूमीवर पोहोचण्यासाठी प्रमुख मार्ग असलेला सेंट्रल बाजार रोड उद्या, १ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हजारो अनुयायांची कोंडी होणार आहे.

रामदासपेठेतील सेंट्रल बाजार रोडवर कल्पना बिल्डिंगपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, आता त्यापुढे जनता चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्पना बिल्डिंग ते जनता चौकापर्यंतचा डावीकडील रस्ता पुढील दोन महिने बंद राहणार आहे. उद्या १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे. विशेष म्हणजे, येत्या ५ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तनदिन आहे. या दिवशी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी त्यांच्या अस्थिच्या दर्शनासाठी तसेच दीक्षेसाठी येतात. दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी सेंट्रल बाजार रोडही एक रस्ता आहेत. जनता चौकातून वळून नागरिक दीक्षाभूमीकडे जातात. दरवर्षी या रस्त्याने हजारो अनुयायी दीक्षाभूमी येथे पोहोचतात. परंतु महापालिकेने सेंट्रल बाजार रोडवरील कल्पना बिल्डिंग ते जनता चौकापर्यंतच्या तीन वर्षांपासून थांबलेले रस्त्याचे काम अचानक धम्मचक्र प्रवर्तनदिन तोंडावर

दीक्षाभूमीवर येणाऱ्यांची कोंडी

असताना सुरू करण्याचा निर्णय घेतला. दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनाची जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे धम्मचक्र प्रवर्तनदिनी जनता चौकातून वळण घेऊन सेंट्रल बाजार रोडकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची कोंडी होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित काम ५ ऑक्टोबरपर्यंत रोखणे शक्य असतानाही महापालिकेने घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता बळावली आहे.

आयुक्त राधाकृष्णन यांनी दिले आदेश

सिमेंट रोड बांधकामाकरिता सेंट्रल बाजार रोड, कल्पना बिल्डिंग ते जनता चौकापर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये या मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस डाव्या बाजूकडील मार्ग बंद करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे. कंत्राटदाराने बॅरिकेड्स लावून स्वयंसेवक नेमावे, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि एलईडी बॅटन व ब्लिकर्सचा वापर करावा. याशिवाय वळणाबाबत फलक लावण्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com