NDCC Bank Fraud: महत्त्वाची बातमी! एनडीसीसी घोटाळा प्रकरण, जामिनासह शिक्षा निलंबन अर्ज न्यायालयाकडून मंजूर

NDCC Fraud Case, All Convicts Bail | एनडीसीसी घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या पाच आरोपींच्या जामिनासह शिक्षा निलंबन विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे.
NDCC Bank Fraud: महत्त्वाची बातमी! एनडीसीसी घोटाळा प्रकरण, जामिनासह शिक्षा निलंबन अर्ज न्यायालयाकडून मंजूर

Sunil Kedar NDCC Bank Fraud: एनडीसीसी घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या पाच आरोपींच्या जामिनासह शिक्षा निलंबन विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे. यामध्ये, तत्कालीन व्यवस्थापक अशोक चौधरी यांच्यासह दोषी ठरलेल्या चार रोखे दलालांचाही समावेश आहे.

या प्रकरणी ऊर्मिला जोशी फलके यांच्या समक्ष सुनावणी झाली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले -पूरकर यांनी २२ डिसेंबरला या घोटाळ्यातील सहा आरोपींना शिक्षा सुनावली.

दोषींना प्रत्येकी पाच वर्षे कारावास आणि १२ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावला. यात माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठ, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी आणि अमित वर्मा यांचा समावेश आहे. यापैकी केदार यांनी या शिक्षेला आधीच सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. (Latest Marathi News)

सत्र न्यायालयाने ते फेटाळले होते. पुढे त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर अन्य पाच दोषींच्या अर्जांवर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी प्रथम रोखे दलाल अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी, केतन सेठ व नंतर तत्कालीन व्यवस्थापक अशोक चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

NDCC Bank Fraud: महत्त्वाची बातमी! एनडीसीसी घोटाळा प्रकरण, जामिनासह शिक्षा निलंबन अर्ज न्यायालयाकडून मंजूर
Manoj Jarange: 'सगेसोयऱ्यां'साठी जरांगेंचं पुन्हा उपोषण, प्रकृती खालावली; सरकारला दिला इशारा; म्हणाले, १५ तारखेनंतर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com