नागपुर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ६०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या १ लाख पार  

nagpur district crossed 1 lakh corona patients marked
nagpur district crossed 1 lakh corona patients marked

नागपूर ः नागपुरात मागील आठ महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७८६ वर पोहोचला आहे. यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या ९५ हजार १०३ वर पोहोचली आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत सर्वाधिक ९२.५३ टक्के आहे.

शनिवारी २३६ नवीन बाधितांची भर पडल्याने ऑक्टोबर महिन्यात ११ हजार ३४८ बाधित आढळल्याची नोंद झाली. सप्टेंबरच्या तुलनेत पाच पटीने बाधितांची संख्या घटली आहे. विशेष असे की, कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील ७५ हजार ९३५ , तर ग्रामीण भागातील १९ हजार १६८ जणांचा समावेश आहे. विशेष असे की, मागील महिनाभर कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करण्यात आलेल्यांची संख्या जास्त आहे. 

बुधवारी २३६ जण बाधित आढळले तर ६५५ जणांनी कोरोनावर मात केली. नागपुरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्‍णांची संख्या आता १२९५ शिल्लक आहे. मेडिकलमध्ये २४२ मेयोत ४७ उपचार घेत आहेत. एम्सममध्ये २७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील मृत्यू

कोरोनाबाधितांच्या एकूण ३ हजार ४०३ मृत्यूंपैकी शहरातील २ हजार ४२० आणि ग्रामीण भागातील मृतांची संख्या ५६९ झाली आहे. जिल्ह्याबाहेरील मृतकांचा आकडा ४१४ झाला आहे. मार्च-२०२० मध्ये कोरोनाचे संक्रमण नागपुरात सुरू झाल्यानंतर सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात नोंदवले गेले आहेत. मागील आठ महिन्यात जिल्ह्यात ६ लाख ३३ हजार ३४ कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत.यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ३ लाख ४४ हजार ७५५, तर रॅपीड ॲन्टिजन चाचण्यांची संख्या २ लाख ८८ हजार २७९ झाली आहे.

९८ वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात

उपराजधानीत शनिवारी रामदासपेठ येथील सुश्रुत रुग्णालयातील उपचारादरम्यान एका ९८ वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली. प्रभाकर शुक्ला (सावरकर नगर) असे कोरोनामुक्त झालेल्या वृद्धाचे नाव आहे. १८ ऑक्टोबरला खोकला, सर्दी, तापासह इतर त्रास असल्याने त्यांना डॉ. समीर शहाणे यांच्याकडे उपचार केले. रुग्णाला न्यूमोनियासह त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचेही प्रमाण कमी असल्याचे पुढे आले. चाचणीतून वृद्ध कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले. सात दिवस प्रकृती अत्यवस्थ होती.

अतिदक्षता विभागात उपचार झाले. १३ दिवस उपचाराने हळू- हळू त्यांची प्रकृती सुधारली. शनिवारी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. डॉ. महेश सारडा, डॉ. तपन बडोले, डॉ. संतोष शिंगोरे या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले. संचालक डॉ. वर्षा सारडा आणि संचालक डॉ. सुश्रुत बाभुळकर यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

महिनानिहाय कोरोनाचे मृत्यू

-एप्रिल -२ मृत्यू
-मे -९ मृत्यू
-जून -१४ मृत्यू
-जुलै -९३ मृत्यू
-ऑगस्ट -८६१ मृत्यू
-सप्टेंबर -१३७६ मृत्यू
-ऑक्टोबर -६०२ मृत्यू

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com