Water Level : नागपूर जिल्ह्यातील धरणांची पातळी खालावली; सिंचन प्रकल्पांत मर्यादित साठा

सिंचनासह वेगवेगळ्या कारणांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची पाणीपातळी सप्टेंबरच्या तुलनेत बरीच कमी झाली आहे.
Nagpur District Dam Water Level Decrease
Nagpur District Dam Water Level DecreaseSakal

नागपूर - सिंचनासह वेगवेगळ्या कारणांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची पाणीपातळी सप्टेंबरच्या तुलनेत बरीच कमी झाली आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यांच्या आकडेवररीसोबत तुलना केल्यास बहुतेक प्रकल्पांमधील सध्याची पाणीपातळी चिंतेत भर टाकणारी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीबाणीचे संकेत मिळत आहेत.

सप्टेंबर महिन्यात नागपूर शहराची तहान भागविणारे नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्प १०० टक्के भरले होते. शहरालगतच्या वसाहतींची गरज भागविणारे वडगाव धरणही ९८ टक्के भरले होते. सद्यःस्थितीत मात्र नवेगाव खैरी प्रकल्पातील पाणीसाठा ११२ दशलक्ष घनमीटरवर आला असून हे प्रमाण ५१ टक्के आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९२.८९ टक्के जलसाठा होता. तोतलाहोह धरणात ८०.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९४.६५ टक्के होता. वडगाव धरणातील जलसाठा ८२.७७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९४.९५ टक्के होता.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आजघडीला एकूण ३ हजार ३८९ दलघमी जलसाठा असून एकूण क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण ७३.६५ टक्के आहे. गतवर्षी याच सुमारास धरणांमध्ये ८६.२४ टक्के जलसाठा होता. जलसाठा कमी वाटत असला तरी पाण्याची गरज लक्षात घेता तो चांगला असल्याचे मानले जात आहे. मध्यम प्रकल्पांची जलधारण क्षमता ७०८ दलघमी असून ५५५ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

सप्टेंबर महिन्यात ९४.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला जलसाठा आता ७६ टक्क्यांवर आला आहे. गतवर्षी याच कालावधीत ८८.३० टक्के जलसाठा होता. लघु प्रकल्पांमधील जलसाठ्याचे प्रमाण काहीसे कमी दिसत आहे. या प्रकल्पांमधील जलसाठा सप्टेंबरमध्ये ४५२.७१ दलघमीपर्यंत अर्थात ७६ टक्क्यावर पोहोचला होता. तो आता ३८४ दलघमीवर म्हणजेच ६४ टक्क्यांवर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com