Nagpur : जिल्ह्यात साथीचे आजार वाढले; दर चौथा व्यक्ती फणफणतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : जिल्ह्यात साथीचे आजार वाढले; दर चौथा व्यक्ती फणफणतोय

Nagpur : जिल्ह्यात साथीचे आजार वाढले; दर चौथा व्यक्ती फणफणतोय

नागपूर : ‘ऑक्टोबर हिट’चे दिवस संपताच थंडीची चाहूल लागते. पहाटेच दाट धुक्यांची चादर पसरते. गरम कपडे बाहेर निघतात आणि शेकोट्या पेटायला लागतात. मात्र,गेल्या काही वर्षातील तापमानात बदल झाल्याने हिवाळ्यात उकाडा आणि पाऊस अनुभवायला येतो आहे. ऋतूमानातील बदलाचा शरिरातील तापमानावरही बदल होत असून साथीच्या आजारात वाढ होत आहे. आज नागपूर जिल्ह्यातील दर चौथा व्यक्ती सर्दी,पडसे, ताप,खोकला, दमा सारख्या आजारांनी त्रस्त आहेत.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

तापमानातील बदलाने शरीरातील थर्मल बॅलन्स (शरीराच्या तापमानाचासमतोल) बिघडतो. उष्णतेमुळे ताप, डिहायड्रेशन, डोकेदुखी या आजारांचे प्रमाण वाढते.ज्यांना मधुमेह, दमासारखे आजार आहेत, अशा रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पान २ वर

नागपूर जिल्ह्यात दर चौथा व्यक्ती साथीच्या आजाराने बेजार असून अवघ्या २२ दिवसांत सर्दी खोकला आणि तापाच्या एक लाख लोकांनी चाचणी केली आहे. दुसरीकडे याच काळात केवळ १ लाख व्यक्तींनी कोरोनाची चाचणी केली. दुपारी उन्हाचा तडाखा, रात्री अचानक पाऊस यामुळे हवेची गुणवत्ता घसरते. वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढतो. सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागतो. अशा वातावरणात व्हायरस अ‍ॅक्टिव्ह होतात. यामुळे टॉन्सिलच्या गाठींवर सूज येऊन गिळताना त्रास होत असल्याच्या लहान मुलांच्या तक्रारी वाढल्या आहेत. न्यूमोनियाची मोठी भीती आहे.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

नागरिकांनो,अशी घ्या काळजी

  • मधुमेह, किडनी आजार असणाऱ्यांनी हवेत फिरणे टाळावे.

  • थंडीत पाठ,पायदुखी वाढत असल्याने वयोवृध्दांनी काळजी घ्यावी.

  • सकाळी थंड हवेशी संपर्क,थंड पाण्याने स्नान केल्यास व्हायरलची भीती.

  • मधुमेहींनी या दिवसांत पायाच्या भेगा; तसेच इतर संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी

"संसर्ग होऊ नये यासाठी खोकताना काळजी घ्या. नाक, छाती भरून आली तर वाफारा घ्यावा. अतितेलकट, थंड, आंबट टाळावे तसेच कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे आरोग्यासाठी चांगले आहे."

-डॉ. विजय धोटे, बालरोग तज्ज्ञ, सावनेर-नागपूर

loading image
go to top