Nagpur : दिग्गजांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Music news

Nagpur : दिग्गजांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट

नागपूर : आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या नागपुरातील दिग्गज गायकांना ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. निमित्त आहे मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नागपूर व श्री बाबूरावजी झाडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे.

हेही वाचा: Nagpur : बेघरांवर पोलिस बळाचा वापर

शनिवार (दि. २२) ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वाजता भाग्यश्री नगर, गोस्वामी डेअरीच्या मागे खरबी रोड याठिकाणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे ‘सकाळ माध्यम समूह’ माध्यम प्रायोजक आहे. तर भारतीताई नितीन झाडे, गोस्वामी डेअरी प्रॉडक्ट्स हे प्रायोजक आहेत.

हेही वाचा: Nagpur : साहेब दिवाळी आहे, पैसे आले का?

दिपावली पहाट कार्यक्रमात नागपुरातील सुप्रसिध्द गायक सागर मधुमटके, गायक संजय पोटदुखे, गायक भूषण जाधव, गायिका गौरी शिंदे, गायिका पल्लवी कुंभारे व संच यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा: Nagpur : दिवाळी पहाट’ला स्वरांची मेजवानी

नागपुरातील सुप्रसिद्ध गायक यांच्या सुमधुर भावभक्ती मराठी हिंदी गीतांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज साल्पेकर करणार आहेत. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक हरिओम भद्रे यांनी केले आहे.