Nagpur Accident: मद्यधुंद कारचालकाने बहीण-भावाला उडविले; पाचपावली पुलावर थरार, उड्डाणपुलाखाली दोघेही फेकल्या गेले

मद्यधुंद कारचालकाने भर वेगात वाहन चालवून दुचाकीने जाणाऱ्या बहीण-भावाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही पुलाखाली फेकल्या गेले.
Nagpur News
Nagpur News Esakal

Nagpur Drunken Car Driver Dashed Siblings: मद्यधुंद कारचालकाने भर वेगात वाहन चालवून दुचाकीने जाणाऱ्या बहीण-भावाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही पुलाखाली फेकल्या गेले. ही घटना पाचपावली उड्डाणपुलावर धुळवडीच्या दिवशी भर दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी रोष व्यक्त करून कारच्या काचा फोडल्या.

मोहम्मद ईरफान अंसारी (वय ३०) रा. टेका, नवी वस्ती आणि फैजीया अंसारी (२१) रा. मोमिनपुरा अशी जखमी बहीण-भावाची नावे आहेत. ईरफानच्या बहिणेचे अलीकडेच लग्न झाले. तिचे सासर मोमिनपुऱ्यात आहे. होळी निमित्त भाऊ ईरफान बहिणीला घ्यायला तिच्या घरी गेला. बहिण तयार झाली आणि दोघेही घरी जाण्यास निघाले. पाचपावली उड्डाण पुलावरून कमाल चौकच्या दिशेने जात असताना अचानक कमाल चौकाकडून गोळीबार चौकाकडे जाणाऱ्या कार चालकाने मद्यधुंदीत भरधाव कार चालवित दुचाकीला जबर धडक दिली.(Latest Marathi news)

धडक इतकी जोरदार होती की, बहीण-भाऊ उड्डाणपुलावरून खाली फेकल्या गेले. मात्र, दोघेही रस्त्याजवळील एका झाडावर अडकले त्यामुळे त्यांना गंभीर जखम झाली नाही. जखमींना मेयो रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Nagpur News
Shivsena UBT: तिकिट जाहीर पण आले ईडीचे समन्स, ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत; काय आहे प्रकरण?

आरोपी कार चालक राहुल मंगले (वय ४१) रा. श्रीकृष्णनगर, याला अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यधुंदीत असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. कारच्या झडतीत दारूच्या दोन बाटल्या आणि एक लोखंडी चाकू आढळला. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. मद्यधुंद कार चालकावर रोष व्यक्त करण्यात आला. संतप्त नागरिकांनी कारच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी स्थिती लवकरच नियंत्रणात आणली. (Latest Marathi news)

Nagpur News
ED Raids: लॉकर किंवा भिंतीत नव्हे, चक्क वॉशिंग मशीनमध्ये दडवले होते 2.54 कोटी रुपये; ईडीच्या छाप्यात झाले उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com