
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर गेल्या सात दिवसांपासून सध्या हा विभाग वाऱ्यावर आहे. दोन्ही विभागांचा प्रभार अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांकडे देण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा प्रलंबित फायलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.