Nagpur: शिक्षण विभागाची शाळेला 'कडक शिक्षा'! शिक्षणाधिकाऱ्याला येण्यास केला होता मज्जाव

तपासणीसाठी गेलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना चक्क एका शाळेत प्रवेशापासून रोखण्यात आले.
Nagpur
Nagpur

Nagpur News: तपासणीसाठी गेलेले माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना चक्क एका शाळेत प्रवेशापासून रोखण्यात आले. त्यांना पाहून कर्मचाऱ्यांनी मुख्य दरवाजाला कुलूप लावले. उमरेड तालुक्यातील बेला येथील गुरुकृपा शाळेत हा प्रकार घडला. यापूर्वी तहसीलदार, गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनाही शाळेत प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे आता संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे.

रवींद्र काटोलकर बुधवार, २७ डिसेंबरला बेला येथील गुरुकृपा शाळेच्या तपासणीकरिता गेले होते. त्यांच्यासोबत उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुशील बन्सोड, शिक्षण विस्तार अधिकारी मनोज पाटील, केंद्रप्रमुख मधुकर पजई उपस्थित होते. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. (Latest Marathi News)

ही शाळा शिक्षण विभागाचे कोणत्याही प्रकारचे आदेश, नियमांचे पालन करत नाही. विद्यार्थी व शाळा माहिती संबंधित असलेले यूडायस प्लस, सरल पोर्टल, विद्यार्थी आधार, विद्यार्थी लाभाच्या योजना, स्पर्धा परीक्षा याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती किंवा लाभ विद्यार्थ्यांना देत नाही. याशिवाय शाळेकडून शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही शाळेत तपासणीसाठी प्रवेश देत नाही. शाळेबाबत तक्रारी असल्याने स्वतः शिक्षणाधिकारी गेले; परंतु त्यांनाही प्रवेश देण्यात आला नाही.

Nagpur
अंगणवाड्यांची जबाबदारी झेडपी शाळांकडेच! दररोज एक तास अध्यापन; अंगणवाड्यांच्या चाव्या शासकीय मालमत्ता, चाव्या द्याव्याच लागतील

बेला येथील गुरुकृपा कॉन्व्हेंटच्या तपासणीसाठी पथकासह गेलो. शाळेने मुख्य दरवाजाला कुलूप लावून प्रवेश दिला नाही. ही शाळा सरल, यूडायसवर माहिती भरत नाही. त्यामुळे या शाळांची मान्यता रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहे. (Latest Marathi News)
रवींद्र काटोलकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Nagpur
Bus Fire accident: मध्य प्रदेशात भीषण अपघातानंतर बसला लागली आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू, १४ जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com