Nagpur Extortion: बांधकाम व्यवसायिकाला मागितली २०० कोटींची खंडणी, प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावावर केली फसवणूक

बांधकाम कंपनीत गुंतवणूक करीत, तारण म्हणून ठेवलेल्या विविध मालमत्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर करीत कंपनीच्या संचालकाला २०० कोटींची खंडणी मागणाऱ्या व्यावसायिक बंधुंवर सदर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Nagpur News
Nagpur News Esakal

Nagpur Extortion Case: बांधकाम कंपनीत गुंतवणूक करीत, तारण म्हणून ठेवलेल्या विविध मालमत्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर करीत कंपनीच्या संचालकाला २०० कोटींची खंडणी मागणाऱ्या व्यावसायिक बंधुंवर सदर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी जयप्रकाश गुरुदासमल खुशलानी (वय ५७, रा.बैरामजी टाउन) यांच्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल केला.

महेश चंद्रभान किंगराणी, राजेश चंद्रभान किंगराणी (रा. शिवाजीनगर, धरमपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयप्रकाश खुशलानी हे परदेसी कन्स्ट्रक्शन, जेपी हाऊसिंग प्रा. लि., जेपीके सन्स, जेपी रिॲलिटीज अशा विविध जेपी ग्रुपमध्ये संचालक आहेत. महेश आणि राजेश यांनी २०१९ मध्ये त्यांच्या विविध फर्ममध्ये १० कोटी ३९ लाख ९० हजारांची गुंतवणूक केली.

त्यापैकी त्यांना कंपनीच्या वतीने १ कोटी २० लाख ३० हजार रुपये परत करण्यात आले. याशिवाय उर्वरित ९ कोटी १९ लाख ६० हजारांच्या रकमेसाठी कडबी चौक आणि नंदनवन येथील जागेसाठी तारण म्हणून विकण्यासाठी करार करण्यात आला. त्याची कायदेशीर प्रक्रियाही केली होती.

२०२० मध्ये किंगराणी बंधुंनी अधिक रक्कम गुंतविण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना तारण म्हणून बोकारा परिसरातील जमिनीचाही विक्री करार करून देण्यात आला. त्यानंतर खुशलानी आणि किंगराणी यांनी करार करीत, प्रकल्पातून खुशलानी यांना २५ कोटी आणि ५० टक्के प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च आणि नफ्यातील ५० टक्के देण्याचे मान्य केले.

मात्र, २०२१ मध्ये त्यांनी कडबी चौक आणि नंदनवन येथे सुरू असलेल्या प्रकल्पात नफा नसल्याचे कारण देत, नवा करार केला. त्यावर धमकी देत, स्वाक्षरी करून घेत, त्याची कागदपत्रे आपल्याकडेच ठेवून घेतली. त्यात मनाप्रमाणे बदल करून घेत, १६ कोटी ६५ लाख ७ हजार ५०० रुपये आपल्याकडे वळतेही केले.

याशिवाय नंदनवन येथील प्रकल्पाची रक्कम गड्डीगोदाम आणि बोकारा येथे मालमत्ता खरेदीसाठी लावली. याच दरम्यान त्यांनी नंदनवन प्रकल्प निर्णायक टप्प्यात असतानाही तो बंद पाडून त्यात गुंतवणुकीसाठी मनाई केली. याशिवाय आत्तापर्यंत गुंतविलेले पैसे न देता, दोनशे कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

Nagpur News
Mukhtar Ansari: मुख्तार अन्सारीने योगी आदित्यनाथ यांना केलं होतं टार्गेट! कसा वाचला जीव? IPS अधिकाऱ्याने सांगितला थरारक अनुभव

विशेष म्हणजे, तारण असलेल्या जमिनीच्या कागदपत्रांच्या गैरवापर करीत, त्यांनी न्यायालयात प्रकरण नेले. त्यापूर्वी त्यांनी तिन्ही जागांची स्वतःच्या नावाने सेल डीड तयार केली, यावरून फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबत त्यांची भेट घेऊन गुंतविलेले पैसे व्याजासह परत देऊन तारण ठेवलेल्या जमिनी परत करण्याची मागणी केली.

मात्र, आरोपींनी २०० कोटी रुपयाची खंडणी मागून ते न दिल्यास सर्व जमिनीच्या कागदपत्रांचा गैरवापर करण्याची धमकी दिली. त्यावरून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यावर त्यांनी तपासणी करीत, सदर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Nagpur News
Mumbai North-Central Lok Sabha 2024: मायानगरीमध्ये हायप्रोफाईल लढत; पण सिद्दीकींची नाराजी काँग्रेसला भारी पडणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com