Nagpur : पहिले नमन नेत्रदान करणाऱ्या देवाला...

आजपासून नेत्रदान पंधरवडा : मरणोत्तर दान करूया नेत्र; डॉक्टरांचेही मानले आभार
Nagpur Eye donation
Nagpur Eye donation

नागपूर : नाव श्रेया...वय १६ वर्षे. डोळ्यात टिक पडली आणि त्यात दृष्टी गेली. वय वाढत गेलं. आई-वडिलांच्या डोळ्यांनीच ती बघू लागली. आई-वडिलांनी खासगी पासून तर मेडिकलपर्यंत उपचारासाठी नेले. दहा वर्षानंतर देव पावला. दोन महिन्यांपूर्वी मेडिकलमध्ये ‘दृष्टी’ मिळाली. नेत्रदानामुळे तिला दिव्यदृष्टीच मिळाली. या चिमुकलीशी संवाद साधला असता, ‘ज्यांनी नेत्रदान केले, त्यांचे डोळे मला दिले तोच माझ्यासाठी देव आहे. ज्या डॉक्‍टरांनी माझ्या डोळ्यांवर ऑपरेशन केले, माझ्या डोळ्यांतील अंधार दूर केला ते माझ्यासाठी देव आहेत. नेत्रदान करणाऱ्या त्या देवाला माझे पहिले नमन, तर दुसरे नमन डॉक्‍टरला असे सांगताना मोबाईलवरून बोलताना ती गहिरवली. तोंडातून शब्द फुटत नव्हते...अखेर तिने मोबाईल बंद केला.

श्रेया (नाव बदललेले) च्या अंधार दाटलेल्या डोळ्यांत उजेडाची पेरणी करणाऱ्या मेडिकलच्या डॉक्‍टरच्या ऋणात आयुष्यभर राहू अशी बोलकी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी दिली. दानात मिळालेले डोळे पुन्हा दान करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. आपल्या संस्कृतीत स्वार्थत्याग करून गरजूंना केलेले दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. मात्र, एक दान असंही आहे, जे मृत्यूनंतर करता येतं. ते आहे...नेत्रदान..असं असतानाही केवळ देशात एक कोटी ८० लाख अंध आहेत. यातील १ कोटी २० लाख व्यक्ती बुबुळाअभावी अंध असून यात ५० वर्षांखालील युवकांची संख्या ८० टक्के आहे. तर पाऊणे तीन लाख चिमुकली मुले डोळ्यात अंधार घेऊन जगत आहेत. नेत्रदान करून आपण त्यांच्या आयुष्यात प्रकाश नक्की आणू शकतो. २०१९-२० मध्ये देशात ५० हजार ९५३ नेत्रदान झाले. तर महाराष्ट्रात ६ हजार ६५३ नेत्रदान झाले. ३ हजार ५८ जणांना दृष्टी मिळाली. यावर्षी महाराष्ट्रात कॉर्नियाच्या प्रतीक्षेत ७ हजार १७१ जण आहेत.

आयुष्यभर दात्यांच्या ऋृणात राहणार!

प्रत्येकाचा स्वभाव, मूळ प्रकृती वेगळी असते. साहाजिकच अध्यात्माचे तेच सार निरनिराळ्या रीतीने सांगावे लागते. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग, आणि हटयोगाची योजना त्यासाठी शास्त्रात केली आहे. अध्यात्म म्हणजे आपल्यातील स्वला ओळखणे. आपली हीच ओळख मृत्यूनंतरही कायम राहावी अशा भावनेतून इश्‍वराशी, निर्मिकाशी जुळण्याचा मार्ग म्हणजे अवयवदान करणे होय. अवयवदानातून स्वत्व , आपली ओळख म्हणून कुणाच्या तरी शरीरात राहून त्याच्या जीवननिश्‍चयात सहभागी होता येते. असे जगण्याचे आनंदमार्गी व्हायचे असण्यासाठी अवयवदान हा मार्ग आपली इहलोकाची यात्राही सूकर करेन.

बुबुळाच्या आजाराने अंधत्व आलेल्यांचे जीवन नेत्रदानातून प्रकाशमान करता येते. नेत्रदानातून मिळालेल्या तीस टक्के डोळ्यांचा उपयोग यासाठी होतो. उर्वरित डोळे विविध उपचार व संशोधनासाठी वापरण्यात येतात. मेडिकलमध्ये २०१७ पासून आतापर्यंत २२२ जणांचे नेत्रदान झाले. तर ७९ जणांचे अंधत्व दूर करण्यात मेडिकलच्या नेत्रविभागाला यश आले.

- डॉ. अशोक मदान, नेत्ररोग विभागप्रमुख, मेडिकल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com