Nagpur Fake Shalarth ID Scamsakal
नागपूर
Nagpur Fake Shalarth ID Scam: ६८० शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार; शालार्थ घोटाळा, बनावट आयडी तयार केल्याचे उघड
Nagpur News: नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यात १,०८० आयडी तपासले असता ६८० शिक्षकांचे आयडी बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. सायबर पोलिसांनी या सर्वांवर अटक करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
नागपूर: बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिसांकडून आतापर्यंत तपासलेल्या १ हजार ८० आयडीमधून ६८० शिक्षकांच्या आयडी बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वच बोगस शिक्षकांना पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याचे संकेत एसआयटीकडून मिळाले असून शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.