Nagpur Fake Teacher ID Scam
sakal
नागपूर
Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी
Cyber Police to Seek Court Permission for Salary Recovery: नागपूर विभागातील ६७२ बोगस शिक्षकांकडून वेतनाची वसुली होणार; सायबर पोलिस न्यायालयात करणार मागणी, शिक्षण विभाग हादरला.
नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील नागपूर विभागात उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ आयडी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहभागी ६७२ शिक्षकांकडून पगार उचलून शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेतनाच्या वसुलीसाठी पोलिसांकडून न्यायालयात मागणी करण्यात येणार आहे.

