नापिकी, भावही नाही अन् कर्जाचं ओझं वाढलं, शेतकरी दाम्पत्यानं घेतला विषाचा घोट; पतीचा मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज

Nagpur Farmer Death: सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् शेतमालाला भाव मिळत नसल्यानं वृद्ध दाम्पत्य खचून गेलं होतं. ७० वर्षीय वृ्द्ध शेतकऱ्यानं पत्नीसह विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
Nagpur Farmer Death

Debt And Crop Loss Push Farmer Couple To Suicide In Nagpur

Esakal

Updated on

नागपूर: नागपूरमध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात वृद्धाचा मृत्यू झालाय, तर त्यांच्या पत्नीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. नरखेड तालुक्यात ही घटना घडलीय. सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् शेतमालाला भाव मिळत नसल्यानं वृद्ध दाम्पत्य खचून गेलं होतं. ७० वर्षीय वृ्द्ध शेतकऱ्यानं पत्नीसह विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com