Nagpur Farmer Companies Fraud : शेतकरी कंपन्यांना सव्वा कोटीचा गंडा ; माल घेतला, धनादेश वटलेच नाहीत; गुन्हेशाखेकडे तक्रार, ‘आत्मा’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Cheques Issued for Farm Produce Allegedly Remain Unpaid : नागपूर व चंद्रपूरमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मूल्यवर्धित शेतमाल खरेदी करून धनादेश न वटल्याने सुमारे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nagpur Farmer Companies Fraud

Nagpur Farmer Companies Fraud

esakal

Updated on

नागपूर : खरेदी केलेल्या शेतमालाचा मोबदला न देता शेतकरी कंपन्यांची सव्वा कोटीने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक करणाऱ्या कंपनीविरोधात आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार करण्यात आली असून, थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी ‘आत्मा’ ने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.

गावपातळीवर शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांनी प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. मात्र, विपणन साखळी पुरेशी नसल्याने तयार मालाची विक्री आव्हानात्मक ठरली आहे. याचाच फायदा घेत नागपुरातील खासगी कंपनीने विविध शेतकरी कंपन्यांकडून मूल्यवर्धित शेतमाल खरेदी केला, संबंधित रकमेचे धनादेशही दिले.

Nagpur Farmer Companies Fraud
Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

मात्र, कंपनीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते वटले नाहीत. संबंधित कंपनीकडे नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातील सात ते आठ शेतकरी उत्पादक कंपन्यांची मिळून सुमारे सव्वा कोटीची रक्कम थकबाकी असल्याची माहिती आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर कारवाईसाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे रितसर तक्रार करण्यात आली.

मात्र, त्याची अद्याप दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे. शेतकरी कंपन्यांची अस्वस्थता लक्षात घेता आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित कंपन्यांची थकबाकी मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना योग्य निर्देश देण्याची विनंती केली आहे.

"नागपूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या तक्रारीनुसार त्यांची ७३ लाख रुपयांनी फसवणूक झाली. याप्रकरणात कारवाईसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे."

- अर्चना कडू,

संचालक, आत्मा प्रकल्प, नागपूर

Nagpur Farmer Companies Fraud
FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com