FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

FDA Suspended Mumbai Hotels Licence: अन्न व औषध प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत मुंबईतील १० अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित केले आहेत.
FDA Action in Mumbai

FDA Action in Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत धडक तपासणी मोहीम राबवली. १७ ते २० सप्टेंबरदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर स्वच्छता त्रुटी, अन्न साठवणुकीतील अनियमितता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळलेल्या मुंबईतील १० अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत. त्यात दक्षिण मुंबईतील सुमारे ९० वर्षे जुने आणि प्रसिद्ध सुलेमान उस्मान मिठाईवाला, बॅलार्ड इस्टेट येथील स्विगी इन्स्टामार्ट, मालाड पूर्वेतील सद्‌गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्ट, कांदिवलीतील जैन स्वीट अँड भेलपुरी हाऊस यांच्यासह विविध खाद्य आस्थापनांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com