नागपूर : ‘शेतकरी अपघात विमा’ ची प्रकरणे तत्काळ निकाली काढा

जिल्हाधिकारी आर. विमला यांचे निर्देश
Nagpur Farmers Accident Insurance cases Give benefit scheme
Nagpur Farmers Accident Insurance cases Give benefit schemesakal

नागपूर : गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या अटी यापूर्वी जाचक होत्या, त्या शासन निर्णयानुसार शिथिल करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्या.शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन सहानुभूतिपूर्वक प्रकरणे हाताळा व प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कृषी विभागाला दिल्या.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्हा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी पीयूष चिवंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, कृषी उपसंचालक अरविंद उपरिकर, तंत्र सांख्यिकी अधिकारी अर्चना कोचरे,दि युनिवर्सल सोम्पो जनरल इंशुरन्स कंपनीचे प्रतिनिधी रितेश पराते, विमा सल्लागार कंपनी जायका इंशुरन्सचे ब्रोकरेज आशिष निकोसे, संतोष जैस्वाल आदी उपस्थित होते.

विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश त्यांनी दिले. वर्ष २०२०-२१ या वर्षात राज्यस्तरावरून कुठल्याही विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली नसल्याने या खंडित कालावधी नागपूर जिल्ह्यातील ५९ प्रकरणे आयुक्तालयस्तरावर सादर करण्यात आली. त्यातील ४९ प्रकरणे मंजूर होऊन वारसदारांना प्रत्येकी २ लाख या प्रमाणे ९८ लाख नुकसान भरपाई रक्कम थेट वारसदारांच्या खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित १० प्रकरणाबाबत कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले.

या प्रकरणात मिळतो विमा लाभ

वाहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वाहितीधरक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक असे १० ते ७५ वयोगटातील २ जणांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण मिळते. अपघाती मृत्यू झाल्यास व दोन अवयव निकामी झाल्यास प्रत्येकी २ लाख व एक अवयव निकामी झाल्यास एक लक्ष प्रमाणे लाभ अनुज्ञेय आहे, असे शेंडे यांनी सांगितले. रस्ता,रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, सर्पदंश, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, वीज पडून मृत्यू, विजेच्या धक्क्यामुळे झालेले अपघात, खून, उंचावर पडून झालेला अपघात , नक्षली हल्ला, जनावराच्या हल्ल्यामुळे झालेला अपघात, दंगल व अन्य कोणत्याही अपघात संरक्षणासाठी पात्र राहील, असे यावेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com