Nagpur Crime: दारुच्या नशेत बापानेच केला मुलाचा खून, डोक्यावर केला लाकडं फोडायच्या छन्नीने वार

नजीकच्या पिपरा येथील धुलिवंदनाच्या दिवशी दारूच्या नशेत असलेल्या बापानेच पोटच्या मुलाच्या डोक्यावर लाकडे फोडायच्या छन्नीने वार करून ठार केले. ही घटना सोमवारची असून यामुळे खळबळ उडाली आहे.
Nagpur News
Nagpur News Esakal

Nagpur Father Killed Son After Drinking: नजीकच्या पिपरा येथील धुलिवंदनाच्या दिवशी दारूच्या नशेत असलेल्या बापानेच पोटच्या मुलाच्या डोक्यावर लाकडे फोडायच्या छन्नीने वार करून ठार केले. ही घटना सोमवारची असून यामुळे खळबळ उडाली आहे.

धुलिवंदन उत्सव साजरा करीत असताना नजीकच्या पिपरा येथे ह्दयद्रावक घटना घडली. दुपारी बाराच्या सुमारास रामा काकडे (वय ४८) मोबाईलवर मोठमोठ्याने बोलत होता. त्याचा मुलगा सूरज काकडे ( वय २४) याने कमी आवाजात बोला, असे म्हणून हटकले. तेव्हा आरोपीने ‘तू कोण रे, मी माझ्या बापाच्या घरी बोलतो, असे बोलून तुला पाहून घेतो, अशी धमकी देत रागाने घराबाहेर निघून गेला.

सायंकाळी चारच्या सुमारास मुलगा खाटेवर गाढ झोपला होता. तर त्याची आई शेजारी गेली होती. मद्यधुंद असलेल्या रामाने सूरजच्या डोक्यावर लोखंडाच्या छन्नीने वार केले. डोक्यावर वार केल्यामुळे सूरज रक्ताच्या थाळरोळ्यात पडला होता.

सूरजची आई काही वेळाने घरी आली, तेव्हा तिला तुझ्या मुलाला मारून टाकले, असे रामाने सांगितले. या प्रकारामुळे सूरजची आई धाय मोकलून रडू लागली. लागलीच तिने शेजाऱ्यांना बोलाविले. सूरज याला उपचारासाठी नागपूरला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Nagpur News
MGNREGA Wage: निवडणुकीपूर्वी कामगारांना मोदी सरकारची मोठी भेट; मनरेगाच्या मजुरीत केली वाढ, काय आहेत नवे दर?

या घटनेने ग्रामस्थ सुन्न झाले. दोघेही बापलेक दारूच्या आहारी गेल्याने नेहमीच त्यांच्यात भांडणे होत असल्याची चर्चा आहे. मुलगा मृत्यू झाला तर बाप तुरुंगात गेल्याने आईची अवस्था मनोरुग्णासारखी झाली. आरोपी रामा काकडे विरुद्ध ३०७, ३०२ कलमाने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित कदम, पोलिस उपनिरीक्षक खंडेराव बोडगीर, बीड जमादार सुधीर राठोड तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये दहशत निर्माण झाली असून अवैध दारूविक्रीमुळे असे प्रकार घडत असल्‍याचा आरोप करण्यात येत आहे

Nagpur News
MGNREGA Wage: निवडणुकीपूर्वी कामगारांना मोदी सरकारची मोठी भेट; मनरेगाच्या मजुरीत केली वाढ, काय आहेत नवे दर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com