Nagpur Fire : अगरबत्ती कारखान्यासह सायकल गोदाम जळाले

दोन आगीच्या घटनांत कोट्यवधीचे नुकसान शेजारच्या इमारतीलाही फटका
nagpur
nagpursakal

नागपूर - शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर कळमना व वर्धमाननगर परिसरात अनुक्रमे अगरबत्तीचा कारखाना व सायकलच्या गोदामाला लागलेल्या आगीत २ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान झाले. रात्रीची वेळ असल्याने कर्मचारी कामावर नसल्याने जिवितहानी टळली. वर्धमाननगरातील आगीचा फटका शेजारच्या इमारतीलाही बसला असून २५ लाखांची हानी झाली.

जुनी कामठी रोडवर कळमना येथे दाऊद बेग यांच्या मालकीचा हंसराज अगरबत्ती नावाने कारखाना आहे.या कारखान्याला गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील सुगंधित द्रव,

अगरबत्तीसाठी आवश्यक बारीक काड्या असल्याने आगीने तत्काळ रौद्ररुप धारण केले होते. आगीच्या ज्वाळा दुरून दिसत होत्या. परिसरात मोठा धूर पसरल्याने रात्रीची वेळ असतानाही बघ्यांची गर्दी झाली होती.

nagpur
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला. अगरबत्तीसाठी आवश्यक कच्चा माल ज्वलनशील असल्याने आग आणखी जास्त पसरली. अग्निशमन जवानांनी सुमारे पाच तास पाण्याचा मारा करून पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण आणले.

nagpur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

परंतु आगीत कच्च्या मालाशिवाय तीन मशीन, विद्युत साहित्य, तारा, एका दुचाकीची राखरांगोळी झाली. या आगीत सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून २ लाख रुपयांची बचत केल्याचे मुख्य अग्निमशन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांनी सांगितले.पूर्व नागपुरातील वर्धमाननगरात सायकल व इतर साहित्याच्या गोदामालाही गुरुवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास आग लागली.

दोन आगीच्या घटनांत कोट्यवधीचे नुकसान

मुकेश व त्यांच्या पत्नी मीना ठवकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये परफेक्ट सायकल व रेक्झिन, फोमचे गोदाम स्वामी नारायण शाळेला लागून आहे. रात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास येथेही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी रवाना झाले. गोदामात रेक्झीन, टायर, फोमचा साठा असल्याने आग वेगाने पसरली.

आगीने शेजारी असलेल्या संतोष जैन यांच्या इमारतीलाही कवेत घेतले. याशिवाय स्वामी नारायण इमारतीच्या भिंतीचेही नुकसान झाले. या आगीत ठक्कर यांच्या मालकीचे पिकअप वाहन, टिनाचे शेड, टायर, फोम, सायकली जळून राखरांगोळी झाल्या. यात त्यांचे पावणे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जैन यांच्या इमारतीचेही २५ लाखांचे नुकसान झाले. दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

nagpur
Nagpur News : सक्तीची ‘ई-पीक पाहणी’ ठरली डोकेदुखी नेटवर्कचा अभाव ; तांत्रिक ज्ञानापासून शेतकरी अनभिज्ञ

दोन्ही ठिकाणी अग्निशमन यंत्रणेचा अभाव

कळमना येथील अगरबत्तीचा कारखाना व वर्धमाननगरातील सायकल गोदामाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा नसल्याची बाब पुढे आली. मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे यांनी याबाबत दुजोरा दिला. महापालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन विभागाकडेही कोणत्याही यापैकी दोन्ही इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र जारी केल्याची नोंद नसल्याचे चंदनखेडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com