esakal | नागपूर: मेडिकलच्या कोविड रुग्णालयात फायर यंत्रणा
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर: मेडिकलच्या कोविड रुग्णालयात फायर यंत्रणा

नागपूर: मेडिकलच्या कोविड रुग्णालयात फायर यंत्रणा

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कोविड हॉस्पिटलमधील गरजेनुसार अग्निशमन यंत्रणा (फायर सेफ्टी) नसल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न वर्षानुवर्षे ऐरणीवर आहे. मात्र २०२० मध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर मात्र फायर ऑडिटची सक्ती करण्यात आली. यामुळेच कोविड काळात मेडिकलमधील अग्निशमन यंत्रणेसाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झाले. लवकरच ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा: विदर्भात उभारली उजव्या सोंडेच्या गणपतीची मंदिरे

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू विभागातील अतिदक्षता विभागाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्यात दहा बालकांचा दुदैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शासनाने तातडीने राज्यातील सर्व शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयांसह आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचे अग्निशमन व इलेक्ट्रिकल अंकेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार मेडिकल रुग्णालयाचेही अंकेक्षण (ऑडिट) झाले. ११० एकरात पसरेल्या मेडिकल, टीबी वॉर्ड व सुपरमध्ये सुमारे १८ते २० कोटीचा खर्च आहे. मात्र पहिल्या टप्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड रुग्णालयासह येथील तीन अतिदक्षता विभागात तातडीने फायर ऑडिटमधील त्रुटीनुसार अग्निशमन यंत्रणा दुर करण्याचे काम दोन दिवसांतच सुरू होणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता यांनी दिला.

प्रत्येक वार्डात पाण्याची पाईपलाईन व त्याला फवारे लागणे, आग लागल्यास अ‍ॅलर्ट देणारे अलार्म व सूचना देणारी यंत्रणा लावणे, आग विझवण्यासाठी आवश्यक पाण्यासाठी स्वतंत्र्य टाकीची सोय करण्यासोबतच इतरही कामांचा समावेश यात असणार आहे.

मेडिकल सत्तर वर्षांपुर्वीचे आहे. यामुळे या परिसरात तत्काळ ही यंत्रणा उभारणे शक्य नव्हते. मात्र नव्याने उभारलेल्या कोविड हॉस्पिटलसह तीन अतिदक्षता विभागात अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येत आहे. यानंतर मेडिकलमध्ये सुरक्षित वातावरणात उपचार होतील. - डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल

loading image
go to top